Post Office : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत जोरदार कमाई, इतके टक्के मिळेल व्याज?

Post Office : टपाल खात्याच्या या योजनेत तुम्हाला होईल तगडा फायदा..

Post Office : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत जोरदार कमाई, इतके टक्के मिळेल व्याज?
व्याजदर वाढीचा फायदा
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 11:29 PM

नवी दिल्ली : टपाल खात्याच्या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ही योजना तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकते. केंद्र सरकारने (Central Government) जानेवारी ते मार्च महिन्यात काही अल्पबचत योजनांवरील (Small Saving Schemes) व्याजदरात (Interest Rate) वाढ केली आहे. यामध्ये किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही योजना खूप लोकप्रिय आहे. केंद्र सरकारने किसान विकास पत्रमधील गुंतवणुकीवरील व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही संधी फायद्याची ठरेल.

सर्वसाधारणपणे पोस्ट खात्यातील गुंतवणूक सुरक्षित मानण्यात येते. त्यामुळे पारंपारिक गुंतवणूकदारांसह तरुणही पोस्ट खात्यातील अनेक अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. किसान विकास पत्र ही योजना रक्कम दामदुप्पट करण्यासाठी ओळखल्या जाते.

गुंतवणूकदार जोखीम न घेता रक्कम दामदुप्पट करण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करतात. या नवीन वर्षात केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. नवीन व्याज दरात केंद्र सरकारने वाढ केली. आता व्याजदर 7.0 टक्क्यांहून 7.2 टक्के झाला आहे.

हे सुद्धा वाचा

या 1 जानेवारी 2023 रोजी पासून नवीन नियम लागू झाले आहे. त्यामुळे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. कोणताही गुंतवणूकदार 1000 रुपये गुंतवणूक करुन या योजनेत खाते उघडू शकतो. योजनेत कमाल कितीही रक्कम गुंतविता येते. 18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक योजनेत खाते उघडू शकतो.

पोस्ट ऑफिस बचत योजनेतंर्गत विविध पर्याय उपलब्ध आहेत. बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, मासिक योजना, बचत प्रमाणपत्रे इत्यादी. गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार या पर्यायांमधून निवड करू शकतात. आता तर गुंतवणूकदारांना ऑनलाईनही अर्ज करता येतो.

पोस्ट ऑफिस बचत खाते रोखीनेच उघडता येते. ग्राहकांसाठी आता धनादेश आणि एटीएमची सुविधाही देण्यात येते. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरीत करता येते. बचत खात्यावर व्याजही मिळते.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....