PPF Account: पीपीएफ खात्यातून पैसे काढण्याची करु नका घाई; अशी संधी पुन्हा नाही

प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी पीपीएफ खात्यात पैसे जमा केल्यास संपूर्ण महिन्याचे व्याज मिळते. 5 तारखेनंतर जमा केल्यानंतर त्या ठेवीवरील व्याजाचा लाभ त्या महिन्यात मिळत नाही.

PPF Account: पीपीएफ खात्यातून पैसे काढण्याची करु नका घाई; अशी संधी पुन्हा नाही
संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 2:07 PM

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडही सर्वात लोकप्रिय सेवानिवृत्ती बचत योजनांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक या योजनेत गुंतवणूक (Investment) करतात. एका आर्थिक वर्षात (Economic Year) किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. सरकारच्या ईईईच्या  अखत्यारीत येणाऱ्या फार थोड्या करमुक्त योजनांपैकी पीपीएफ ही एक योजना आहे. याचा अर्थ असा की पीपीएफमधील ( PPF)आपले योगदान, मिळालेले व्याज आणि एकूण रक्कमेवर, आयकर कलम 80 सी अंतर्गत करातून सूट मिळते.सरकार पुरस्कृत अल्पबचत धोरणाचा हा एक भाग आहे. योजनेतंर्गत कालावधी पूर्ण झाल्यावर खात्रीशीर परतावा मिळतो. वेळीच पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली तर त्याचा मोठा फायदा होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा फायदा पीपीएफ खात्यात जास्त परताव्याच्या स्वरूपात होतो. प्रत्येक आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीत पैसे जमा झाले तर त्याचा परतावा सर्वाधिक असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही पुढच्या महिन्यात किंवा त्यानंतर पैसे जमा करता तेव्हा एक खूणगाठ मनाशी पक्की बांधा की, तुम्हाला 1 ते 4 या तारखेतच रक्कम जमा करायची आहे. त्यानंतर नाही. यामुळे ठेवींवर अधिक परतावा मिळतो.

सध्या पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. ईपीएफनंतरचा हा सर्वाधिक व्याजदर आहे, जो जोखीम-मुक्त बचतीसाठी उपलब्ध आहे. पीपीएफ खातेधारक काही अटींमध्ये त्यांच्या खात्यावर वार्षिक केवळ 1 टक्का व्याजाने कर्ज घेऊ शकतात.पीपीएफ खात्याचा कालावधी 15 वर्षांचा असतो, पण विशिष्ट नियमांनुसार तुम्ही तुमचं अकाऊंटही वेळेआधी बंद करू शकता. पीपीएफ खात्यातून मुदतपूर्व पैसे काढता येतात. मात्र, त्यासाठीही विशेष नियमावली करण्यात आली आहे. या अंतर्गत, प्री-मॅच्युअर रक्कम काढता येते.

अधिक परताव्याची कारणे

जमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजानुसार पीपीएफमध्ये पैसे जोडले जातात. म्हणजेच पैशावरील व्याजावर ही व्याज मिळते. पीपीएफमध्ये जमा केलेले पैसे दरवर्षी चक्रवाढ व्याजाने वाढतात. हे व्याजाचे पैसे आर्थिक वर्षाच्या शेवटी पीपीएफ खात्यात जमा होतात. 5 तारखेपूर्वी पीपीएफ खात्यात पैसे जमा केले तर संपूर्ण महिन्याचे व्याज जोडले जाते.

पीपीएफवरील व्याजाची गणना

पीपीएफमध्ये जमा झालेल्या पैशांवरील व्याज योजनेच्या नियमांनुसार महिन्याच्या 5 व्या आणि शेवटच्या दिवसादरम्यानच्या किमान शिल्लकीवर मोजले जाते. तर हे व्याज दरमहा मिळत असले तरी आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते. त्यामुळे वार्षिक आधारावर पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफ्यासाठी 5 एप्रिलपूर्वी अशी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. मासिक ठेवींच्या बाबतीत विचार करता, ही रक्कम महिन्याच्या सुरुवातीलाच 5 तारखेपूर्वीच जमा करता आली पाहिजे.

पीपीएफमधून पैसे कधी काढता येतील?

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असतो. खाते उघडल्याच्या तारखेपासून 5 आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खातेदार त्यांच्या पीपीएफ खात्यांमधून काही रक्कम काढू शकतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितीतच. उदाहरणार्थ, जानेवारी 2022 मध्ये पीपीएफ खाते उघडल्यास आर्थिक वर्ष 2027-28 मध्ये तुम्हाला पैसे काढता येतील.15 वर्षांनंतर खाते परिपक्व होईपर्यंत आपण आपल्या पीपीएफ खात्यातून सर्व पैसे काढू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की मुदतपूर्व पैसे काढणे कोणत्याही वेळी आपल्या पीपीएफ खात्याच्या शिल्लक रकमेच्या 100 टक्के असू शकत नाही.

Nana Patole Vs Raj Thackeray : मी स्वत: हिंदू, रोज हनुमान चालिसा वाचतो, नाना पटोलेंचा ‘बाऊ’ न करण्याचा सल्ला, नाना बॅकफुटवर?

Post Office : 10 वर्षात या सरकारी योजनेत दुप्पट होणार रक्कम, जाणून घ्या योजनेची सर्व वैशिष्ट्ये

parineeti chopra: शेतात पिकवलेल्या भाज्यांचे फोटो टाकत परिणीता चोप्राने केले वडिलांचे कौतुक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.