पीपीएफ योजनेत तीन महत्वाचे बदल, आता या खात्यांना मिळणार नाही व्याज

PPF Rule Change: 21 ऑगस्ट 2024 रोजी अर्थमंत्रालयाने या योजनेसंदर्भात नवीन गाइडलाइन जारी केले आहेत. त्यानुसार पीपीएफसाठी तीन नवीन नियम आणले आहेत. तसेच सुकन्‍या समृद्धी योजना आणि नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट या योजनेत बदल केले आहे. नवीन गाइडलाइनमध्ये अल्पवयीन व्यक्ती आणि एनआरआय संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

पीपीएफ योजनेत तीन महत्वाचे बदल, आता या खात्यांना मिळणार नाही व्याज
PPF
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 10:22 AM

PPF Rule Change: पब्लिक प्रोव्हीडेंड फंड (PPF) हा गुंतवणूक दरांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. छोटी किंवा मोठी हवी तशी गुंतवणूक आणि अधिक व्याजदर मिळत असल्यामुळे पीपीएफ योजना लोकप्रिय ठरली आहे. 15 वर्षांच्या मॅच्‍योरिटी पीरियडची ही योजना आहे. या योजनेत आता 1 ऑक्टोंबर 2024 पासून बदल करण्यात येणार आहे. पुढील महिन्यांपासून तीन बदल होणार असून त्यासंदर्भात दिशानिर्देश अर्थ मंत्रालयाने जारी केले आहेत. या योजनेत चांगली गुंतवणूक केल्यास करोडपती होऊ शकतो.

21 ऑगस्ट 2024 रोजी अर्थमंत्रालयाने या योजनेसंदर्भात नवीन गाइडलाइन जारी केले आहेत. त्यानुसार पीपीएफसाठी तीन नवीन नियम आणले आहेत. तसेच सुकन्‍या समृद्धी योजना आणि नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट या योजनेत बदल केले आहे. नवीन गाइडलाइनमध्ये अल्पवयीन व्यक्ती आणि एनआरआय संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

अल्पवयीन PPF खाते असेल तर…

PPF खाते अल्पवयीन (18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या) नावाने उघडल्यास, पोस्ट ऑफिस बचत खाते (POSA) व्याजदराने व्याज मिळणार आहे. मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यावर हा व्याजदर लागू असेल. 18 वर्षे वय पूर्ण केल्यावर खात्यावर पीपीएफचा प्रचलित व्याज दर लागू होईल. तसेच खातेचा मॅच्युअरीटी पिरियड त्या तारखेपासून होईल, जेव्हा तो व्यक्ती 18 वर्षांचा होईल.

हे सुद्धा वाचा

एनआरआय नागरिकांसाठी असा बदल

जो भारतीय नागरिक आता NRI झाला आहे आणि त्यांनी त्यांच्या निवासी स्थितीत बदल नोंदवला नाही त्यांना त्यांच्या PPF खात्यावर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पोस्ट ऑफिस बचत खाते (POSA) व्याजदर मिळेल. यानंतर खात्यावर व्याज दिले जाणार नाही. हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील. आणि त्याचा उद्देश PPF खात्यांमध्ये पारदर्शकता आणि नियमितता सुनिश्चित करणे हा आहे.

एकापेक्षा जास्त खाते असेल

एका पेक्षा जास्त खाती असेल तर प्राथमिक खात्यावरील व्याज योजनेनुसार मिळेल. तसेच दुसऱ्या खात्यातील शिल्लक राहिली रक्कम पहिल्या खात्यात विलीन केली जाईल. पीपीएफ खात्याच्या विलीनीकरणानंतर प्रचलित योजना दर किंवा व्याज प्राथमिक खात्यावर उपलब्ध राहतील. प्राथमिक आणि दुय्यम खात्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अतिरिक्त खात्यावर खाते उघडण्याच्या तारखेपासून शून्य टक्के व्याजदर मिळेल. याचा अर्थ एकापेक्षा जास्त खाती उघडली तरी पीपीएफ योजनेंतर्गत व्याज एकाच खात्यावर मिळेल.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....