PPF Account Holder व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसदार अकाऊंट सुरु ठेवू शकतो?
PPF Account | संबंधित खातेधारकाचा मृत्यू झाल्यास व्याजासह संपूर्ण रक्कम त्याच्या वारसदाराला मिळते. त्यासाठी कोणताही लॉक-इन पिरीयड नसतो. हे पैसे मिळवण्यासाठी मृताच्या वारसदाराला जी फॉर्म जमा करावा लागतो.
नवी दिल्ली: Public Provident Fund मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्याचा मोठा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला त्याचे अकाऊंट पुढे सुरु ठेवता येते. संबंधित खातेधारकाचा मृत्यू झाल्यास व्याजासह संपूर्ण रक्कम त्याच्या वारसदाराला मिळते. त्यासाठी कोणताही लॉक-इन पिरीयड नसतो. हे पैसे मिळवण्यासाठी मृताच्या वारसदाराला जी फॉर्म जमा करावा लागतो. (Can a nominee continue ppf account after death of account holder)
Public Provident Fund ही सर्वाधिक लॉक इन पिरीयड असणारी टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक आहे. या योजनेचा लॉक इन पिरीयड 5 वर्षांचा आहे. सहाव्या वर्षापासून या खात्यामधून पैसे काढण्याची मुभा असते. 15 वर्षांच्या कालावधीत ही योजना पूर्ण होते.
PPF अकाउंट पाच वर्षांच्या आतमध्ये बंद करायचे असल्यास त्यासाठी काही नियम आहेत. जर संबंधित खातेधारकाला, त्याच्या पती\पत्नीला कोणता गंभीर आजार असेल तर हे खाते पाच वर्षांच्या आत बंद करता येते. तसेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे हवे असल्यासही हे खाते बंद करता येते. संबंधित खातेधारक NRI झाल्यासही खाते बंद करता येते. मात्र, त्यासाठी एक टक्का व्याजदराइतकी रक्कम कापली जाते. PPF खात्यावर सध्या 7.1 टक्के इतके व्याज मिळते. तिसऱ्या वर्षापासून तुम्ही PPF खात्यावर कर्ज काढू शकता. हे कर्ज तीन वर्षात फेडले तर केवळ एक टक्का व्याजदर आकारला जाईल. तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागल्यास 6 टक्के व्याजदर आकारला जाईल.
संबंधित बातम्या:
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दररोज 100 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीनंतर मिळतील 10 लाख रुपये
कोरोना काळात बँक झाल्या मालामाल; एसबीआयपासून सगळ्याच बँकांची बक्कळ कमाई
(Can a nominee continue ppf account after death of account holder)