Post Office Scheme : अडीनडीला पोस्टाच्या या योजनेतून वेळेपूर्वी काढा पैसा, पण नियम लक्षात ठेवा
Post Office Scheme : अडीनडीला पोस्टाच्या या योजनेतून कालावधी पूर्ण होण्याअगोदर पण पैसा काढता येतो, पण त्यासाठी हा नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस अनेक बचत योजना चालविते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीची बचत योजना लोकप्रिय आहे. ही योजना जोखीममुक्त असून यामध्ये परतावा पण अधिक मिळतो. या अल्पबचत योजनांवर (Small Saving Scheme) केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी व्याज दरात बदल करते. आतापर्यंत भारतीय पोस्ट ऑफिस लोकांच्या गरजा आणि गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अनेक योजना घेऊन आले आहे. भारतीय टपाल खात्याच्या (Post Office) संकेतस्थळानुसार, अल्पबचत योजनांची काही खास वैशिष्ट्ये आहे. त्याची व्याजदरे, कालावधी आणि या खात्यातून रक्कम काढण्याचे काही नियम आहेत. त्याचे पालन न केल्यास फटका बसू शकतो.
POSA चा फायदा पोस्ट खात्याच्या बचत योजनेत रक्कम गुंतविता येते. त्यातून रक्कम काढता येते. पोस्टाच्या बचत खात्यावर वार्षिक 4.0% व्याज मिळते.
आवर्ती ठेव योजना राष्ट्रीय आवर्ती ठेव बचत योजनेसाठी पोस्ट खात्यात अर्ज करता येतो. पोस्टात खाते उघडल्यानंतर तीन वर्षांत ते बंद करता येते. जर हे खाते वेळेपूर्वीच बंद करायचे असेल तर ते करता येते. पण त्यावर नियमाप्रमाणेच व्याज मिळेल. त्यावर नियमाप्रमाणे दंडाची रक्कम आकारुन उर्वरीत रक्कम त्याच्या हातात पडते.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट या खात्यात रक्कम जमा झाल्याच्या तारखेनंतर पुढील सहा महिन्यात एफडी बंद करता येते नाही. जर एखाद्याने पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट खात्यात 6 महिन्यानंतर आणि एक वर्षांच्या आत बंद केले, तर त्यावर व्याज मिळेल. या खात्यात 2/3/5 वर्षांच्या बचतीवर तुम्ही कालावधी पूर्ण होण्याअगोदरच रक्कम काढली तर या बचतीवर तुम्हाला एकूण व्याजदराच्या 2% कमी रक्कम मिळेल.
मासिक बचत खाते या खात्यात पैसा जमा केल्यानंतर एका वर्षाच्या आत पैसा परत घेता येत नाही. खाते एक वर्षानंतर आणि तीन वर्षांच्या आत बंद केले तर ठेवीदाराला फटका बसतो. त्याच्या मूळ रक्कमेत 2% कपात करण्यात येते. तर उर्वरीत रक्कम त्याला परत करण्यात येते. जर खाते 3 वर्षानंतर आणि 5 वर्षांपूर्वी बंद केल्यास मूळ रक्कमेवर 1% कपात करण्यात येते आणि उर्वरीत रक्कम परत करण्यात येते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
- खाते उघडल्यानंतर ते वेळेपूर्वी बंद करता येते
- खाते एक वर्षांपूर्वी बंद करता येते
- पण खाते बंद केल्यास व्याज मिळत नाही
- एक वर्षानंतर आणि दोन वर्षांपूर्वी खाते बंद केले तर मूळ रक्कमेतून 1.5% कपात होते
- खाते 2 वर्षानंतर आणि 5 वर्षापूर्वी बंद केल्यास मूळ रक्कमेतून 1% शुल्क वसूल करण्यात येईल