NPS Scheme : रिटायरमेंटची करा तयारी, कर सवलतीसाठी एनपीएस आहे बेस्ट पर्याय!

NPS Scheme : जर तुम्हाला कर सवलतत, कर बचत करायची असेल तर तुम्हाला राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा पर्याय निवडू शकता. या योजनेत तुमच्या गरजेनुसार, रक्कम कमी जास्त जमा करु शकता. या योजनेत दोन खाती असतात. एक खाते पेन्शनसाठीचे असते. तर दुसऱ्या खात्यातून तुम्हाला एक रक्कमी पैसा मिळतो.

NPS Scheme : रिटायरमेंटची करा तयारी, कर सवलतीसाठी एनपीएस आहे बेस्ट पर्याय!
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 9:53 PM

नवी दिल्ली : या आर्थिक वर्षात (Financial Years) कर बचतीसाठीची अंतिम तारीख आता अगदी जवळ आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत कर बचत योजना निवडली नसेल तर तुम्हाला आता उशीर करुन चालणार नाही. खासगी क्षेत्रात (Private Sector) काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला भविष्याची चिंता नेहमी सतावते. नोकरी सुरु आहे, तोपर्यंत त्यांची धावपळ सुरु असते. त्यांच्या हाती पैसा खेळतो. पण उतारवयात त्यांचे हातपाय चालत नाही आणि औषधांचा खर्च वाढतो. त्यामुळे भविष्यातील खर्च आणि औषधांचा खर्च पेलण्यासाठी अगोदरच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली (National Pension System) ही सरकारी योजना मोठी मदत करेल. एनपीएस (NPS) योजना त्यासाठी महत्वाची ठरते.

सेवानिवृत्तीसाठी आर्थिक तरतूद करणाऱ्यांसाठी ही योजना महत्वपूर्ण ठरु शकते. अनेक पर्यांयापैकी उतारवयासाठी हा पर्याय उपयोगी ठरु शकतो. काही सरकारी योजना त्यासाठी मदतीला येऊ शकतात. प्राप्तिकर अधिनियमच्या अनेक कलमात कर सवलतीची तरतूद आहे. तुम्हाला यातून फायदा उचलता येईल. करदाते सर्वात जास्त कलम 80 सीचा वापर करतात. या कलमातंर्गत आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांना 1.5 लाख गुंतवणूक करुन कर परताव्याचा दावा करु शकतात.

जर तुम्हाला 75,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन हवी असेल तर त्यासाठी फार पूर्वीपासून योजना आखावी लागते. एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. बचतीची ही सवय भविष्यात उपयोगी ठरते. दर महिन्याला 75,000 रुपये पेन्शन मिळवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल. तरच सेवानिवृत्त व्यक्तीचा खर्च सहज भागविता येऊ शकतो. एनपीएसमध्ये इक्विटी, कॉरपोरेट, डेट, गव्हर्नेस बाँड आणि पर्यायी गुंतवणूक फंड असतो.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदाराकडे ॲक्टिव आणि ऑटो, असे दोन पर्याय असतात. यामध्ये इक्विटीमध्ये कमी जोखीम असते. तर पीपीएफ (PPF) आणि मुदत ठेवीतून(FD) जास्त परतावा मिळतो. मॅच्युरिटीनंतरही सर्व रक्कम काढता येत नाही. फंडातील 40 टक्के रक्कम भारतीय आयुर्विमा महामंडळात गुंतवावी लागते.

तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी दर महिना 75,000 रुपये हवे असतील तर तशीच तगडी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महिन्याला 75,000 रुपयांची पेन्शन मिळविण्यासाठी व्यक्तिला जवळपास या फंडमध्ये 3.8 कोटी रुपयांची आवश्यकता असेल. जर एखाद्या तरुणाने 25 व्या वर्षी एनपीएसमध्ये दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवले तर वयाच्या 60 वर्षी, मॅच्युरिटी नंतर ही रक्कम 3,82,80,000 रुपये होईल. 40 टक्के रक्कम एलआयसीकडे जाईल. म्हणजे दर महिन्याला 76,566 रुपये पेन्शन मिळेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.