आता खासगी कंपन्यांनाही LPG विकण्यासाठी परवानगी मिळणार? ‘या’ कंपन्यांची नावं आघाडीवर

LPG Gas | सध्या LPG गॅसचे वितरण हे तीन सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून होते. अलीकडच्या काळात एलपीजीवर सरकारकडून दिलेल्या अनुदानातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता खासगी कंपन्या या क्षेत्राकडे आकर्षित झाल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकार आता खासगी कंपन्यांना या क्षेत्रात प्रवेश देणार का, हे पाहावे लागेल.

आता खासगी कंपन्यांनाही LPG विकण्यासाठी परवानगी मिळणार? 'या' कंपन्यांची नावं आघाडीवर
एलपीजी
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 10:54 AM

मुंबई: गेल्या काही काळापासून मोदी सरकारकडून अनेक क्षेत्रांमध्ये खासगीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये आता LPG म्हणजे घरगुती आणि व्यवसायिक गॅसची विक्री करणाऱ्या क्षेत्राचा समावेश होऊ शकतो. केंद्र सरकारकडून लवकरच खासगी कंपन्यांना LPG विकण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते.

सध्या LPG गॅसचे वितरण हे तीन सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून होते. अलीकडच्या काळात एलपीजीवर सरकारकडून दिलेल्या अनुदानातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता खासगी कंपन्या या क्षेत्राकडे आकर्षित झाल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकार आता खासगी कंपन्यांना या क्षेत्रात प्रवेश देणार का, हे पाहावे लागेल.

गॅस एजन्सी तुमच्याकडून सिलेंडरचे जास्त पैसे घेतेय, कुठे तक्रार कराल?

सूत्रांच्या माहितीनुसार, रिलायन्स गॅस, गो गॅस आणि प्युअर गॅस या तीन खासगी कंपन्या LPG विक्रीच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक आहेत. या तिन्ही कंपन्या नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात कार्यरत असून LPG विक्रीसाठी परवानगी मिळाल्यास या कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो. खासगी कंपन्यांकडून व्यावसायिक वापरासाठीच्या LPG विक्रीला अधिक प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. कारण, घरगुती गॅससाठी सरकारकडून मिळणारे अनुदान केवळ सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना दिले जाते.

अनुदान कमी झाल्यास खासगी कंपन्यांना काय फायदा?

घरगुती गॅसवर केंद्र सरकारकडून अनुदान (Subsidy) दिले जाते. मात्र, गेल्या काही काळापासून मोदी सरकारने या अनुदानाची रक्कम घटवत आणली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तीन कंपन्यांकडूनच ग्राहकांना अनुदानित दरात सिलेंडर दिले जातात. यामध्ये ग्राहकांना पूर्ण पैसे भरून सिलेंडर विकत घ्यावा लागतो. त्यानंतर अनुदानाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. सध्याच्या घडीला देशात उत्पादित होणारा सर्व LPG सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना दिला जातो. याशिवाय, भारत 50 टक्के LPG परदेशातून आयात करतो.

खासगी कंपन्या या क्षेत्रात आल्यास काय फायदा होणार?

रिलायन्स गॅसकडून केंद्र सरकारकडे LPG विक्रीसाठी परवानगी मागण्यात आली आहे. नयारा एनर्जी या कंपनीनेही अशी मागणी केली आहे. या क्षेत्रात खासगी कंपन्या आल्यास ग्राहकांना गॅस कनेक्शन अधिक सुलभतेने उपलब्ध होतील. तसेच ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळेल.

संबंधित बातम्या:

LPG Cylinders : इंडेन, भारत गॅस आणि HP ग्राहकांना मोठा दिलासा! आता सहज बुक करा सिलेंडर, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Paytm वरून गॅस सिलिंडर करा बुक आणि 2700 रुपये कॅशबॅक मिळवा, ऑफर किती दिवस?

तुमच्या सिलेंडरमध्ये किती किलो गॅस? गॅस चोरणारी टोळी सापडली

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.