पॅन, आधारशी संबंधित आजपासून ‘हा’ मोठा नियम लागू; कॅश ट्रान्सॅक्शन करण्याआधी वाचा बातमी

20 लाख रुपयांच्या व्यवहारांना आजपासून आधारकार्डचे बंधन (Aadhaar card) अनिवार्य करण्यात आले आहे. 20 लाख रुपये जमा करायचे असतील अथवा काढायचे असतील तर व्यवहार करताना आधार कार्ड क्रमांक नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे. 26 मे पासून हा नियम लागू करण्यात आला आहे.

पॅन, आधारशी संबंधित आजपासून 'हा' मोठा नियम लागू; कॅश ट्रान्सॅक्शन करण्याआधी वाचा बातमी
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 10:15 AM

या काही दिवसांत मोठा व्यवहार करण्यापूर्वी ही अट समजून घ्या. आधार कार्डसंबंधित (Aadhaar Card) एक मोठा नियम 26 मेपासून लागू करण्यात आला आहे. हा नियम अर्थात बँकेतील व्यवहारासंबंधी (Cash Transaction) आहे. एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांहून अधिकच्या रोखीचा व्यवहार करत असाल तर तुम्हाला आधार कार्ड अथवा पॅन कार्डची माहिती देणे अनिवार्य आहे. जर तुम्ही हा नियम वा-यावर सोडला तर प्राप्तिकर खात्याची तुम्हाला घरपोच नोटीस येईल आणि तुमच्या अडचणीत वाढ होईल. रोखीतील व्यवहारात 20 लाख रुपये खात्यातून काढत असाल तर आधार कार्ड अथवा पॅन कार्ड क्रमांकाची नोंद करणे अनिवार्या करण्यात आले आहे. यापूर्वी हा नियम लागू नव्हता. आजापासून म्हणजे 26 मे पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 20 लाखांच्या व्यवहाराची मर्यादा एका आर्थिक वर्षांकरिता (Fiscal Year) लागू आहे.

केंद्रीय उत्पाद व सीमा शुल्क मंडळाने (CBDT) 10 मे रोजी याविषयीची एक अधिसूचना दिली. रोख रक्कम काढणे अथवा रोखीत रक्कम जमा करणे या व्यवहारांना हा नियम लागू आहे. याची मर्यादा 20 लाख अथवा त्यावरील ज्यादा रक्कम अशी असेल. एक अथवा त्यापेक्षा अधिकच्या बँक खात्यात 20 लाख अथवा त्यापेक्षा अधिकची रक्कम जमा करणे अथवा काढल्यास या नियमाअंतर्गत तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड क्रमांकाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की, बँक राष्ट्रीय असो, सहकारी असो, खासगी असो वा टपाल खात्यातील बचत खाते असो, हा नियम सगळीकडे लागू आहे. या सर्व खात्यात मिळून एकत्रित एका वर्षात 20 लाख अथवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार झाला तर तुम्हाला आधार कार्ड अथवा पॅनकार्डची नोंद करणे अनिवार्य आहे.

काय आहे नियम?

बचत खात्याऐवजी जर एखाद्या व्यक्तीकडे चालू खाते (current account) अथवा रोख क्रेडिट खाते(CC) असो, या खात्यांनाही 20 लाख रोखीचा नियम लागू असेल. नवीन खाते उघडणारे सुद्धा या नियमांपासून सूटलेले नाहीत. बँक राष्ट्रीय असो, सहकारी असो, खासगी असो वा टपाल खात्यातील बचत खाते असो, हा नियम सगळीकडे लागू आहे. या सर्व खात्यात मिळून एकत्रित एका वर्षात 20 लाख अथवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार झाला तर तुम्हाला आधार कार्ड अथवा पॅनकार्डची नोंद करणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर असा व्यवहार करण्यापूर्वी त्यासाठी किमान 7 दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.