रेल्वे 500 पेक्षा अधिक गाड्या बंद करणार? प्रवासी संख्येतील घट आणि तोट्यामुळे मोठा निर्णय!

भारतीय रेल्वेनं झिरो बेस्ड टाईम टेबल असं या बदलाला नाव दिलं आहे. या बदलावर रेल्वेकडून मागील दीड वर्षापासून काम सुरु होतं. याबाबत अजून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. देशभरात 73 रेल्वे विभागातील 500 पेक्षा अधिक बंद असलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरु केल्या जाणार नाहीत.

रेल्वे 500 पेक्षा अधिक गाड्या बंद करणार? प्रवासी संख्येतील घट आणि तोट्यामुळे मोठा निर्णय!
एक्स्प्रेस ट्रेन
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 4:32 PM

मुंबई : भारतीय रेल्वे पुढील काळात एक मोठा बदल करण्याची शक्यता आहे. या बदलाचा उद्देश ट्रेनची स्पीड वाढवणं, ट्रेनचा डिस्टर्बंन्स कमी करणे आणि प्रवाशांची वेळ वाचवणं हा आहे. भारतीय रेल्वेनं झिरो बेस्ड टाईम टेबल असं या बदलाला नाव दिलं आहे. या बदलावर रेल्वेकडून मागील दीड वर्षापासून काम सुरु होतं. याबाबत अजून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. देशभरात 73 रेल्वे विभागातील 500 पेक्षा अधिक बंद असलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरु केल्या जाणार नाहीत. (Railway likely to reduce 500 trains, Decision of Railways due to reduction and loss of passenger number)

जनसत्ताच्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, या रेल्वेंऐवजी 1 हजार जादा पॅसेंजर गाड्या एक्सप्रेस आणि एक्सप्रेस ट्रेन मेल आणि सुपरफास्टमध्ये अपग्रेड केलं जाईल. रेल्वे काम करत असलेल्या झिरो बेस्ड टाईम टेबलवर रेल्वे काम करत आहे त्यात 8 हजार पेक्षा जास्त रेल्वे गाड्यांचा वेळ बदलला जाईल. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे गाड्या बंद करण्याबाबत ठोक माहिती देण्यात आलेली नाही.

8 हजार 202 रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार, वेळ बदलणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार झिरो बेस्ड टाईम टेबल 2022 मध्ये लागू केलं जाण्याची शक्यता आहे. मागील दीड वर्षापासून यावर काम सुरु आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये रेल्वे गाड्या बंद राहण्याचा फायदा घेत रेल्वेनं आयआयटी मुंबईसोबत काम करत नवं वेळापत्रक बनवलं आहे. या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्यांचा वेगच वाढणार नाही तर यात्रेची वेळही घटणार आहे. या वेळापत्रकानुसार देशभरात धावणाऱ्या जवळपास 8 हजार 202 रेल्वे गाड्यांच्या वेळेत दीड ते 5 तास वेळ वाचणार आहे.

दैनिक भास्करच्या एका रिपोर्टनुसार रेल्वेनं देशातील विभिन्न रेल्वे मंडळांमधून चालणाऱ्या 500 पेक्षा जास्त रेल्वे गाड्यांना बंद करण्याची तयारी सुरु केली आहे. रेल्वेला झालेलं नुकसान त्याला कारणीभूत आहे. रेल्वे एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे विचार करत आहे. तोटा होत असलेल्या रेल्वे गाड्या बंद करणे आणि पहिल्या टप्प्यात काही फेऱ्या कमी करण्याची शक्यता तपासली जात आहे.

आधी रेल्वे फेऱ्या कमी, नंतर आढावा

साधारणपणे तिकीट विक्री आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आधारावर याचा अंदाज बांधला जाऊ शकतो की कोणत्या रेल्वे गाड्या किती नफा देतात आणि किती तोट्यात चालवल्या जातात. तज्ज्ञांच्या मदते अचानकपणे कोणतीही रेल्वे बंद केल्यास सर्वसामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे रेल्वेची प्रतिमा मलिन होऊ शकते. तसंच रेल्वे अचानक बंद केल्यानं विरोध होण्याचीही शक्यता असते. अशावेळी रेल्वे पहिल्या टप्प्यात फेऱ्या कमी करु शकते. त्यानंतर 3 ते 4 महिने आढावा घेतल्यानंतर शेवटी या रेल्वे गाड्या बंद केल्या जाऊ शकतात.

इतर बातम्या :

काँग्रेस करणार जातीनिहाय जनगणनेशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास; समिती स्थापन

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप, पंजाबमध्ये काँग्रेसला झटका बसण्याची शक्यता; कसा असेल 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कल?

Railway likely to reduce 500 trains, Decision of Railways due to reduction and loss of passenger number

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.