AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Insurance : रेल्वे प्रवाशांना देते 10 लाखांचा विमा, किती मिळते भरपाई, कसा काढता येतो इन्शुरन्स

Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी 10 लाख रुपयांचा विमा देते. रेल्वेच्या या सुविधेविषयी अनेक प्रवाशांना काहीच माहिती नसते. या विम्यामध्ये रेल्वे दुर्घटना झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. या विम्यासाठी केवळ 45 पैशांचा खर्च आहे.

Railway Insurance : रेल्वे प्रवाशांना देते 10 लाखांचा विमा, किती मिळते भरपाई, कसा काढता येतो इन्शुरन्स
रेल्वेचा विमा आहे तरी काय, असा मिळतो फायदा
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 10:53 AM

दुरच्या प्रवासासाठी भारतीय प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात. दिवसभरात देशातील अनेक रेल्वे स्टेशन गर्दीने फुलून गेलेले असतात. लांबपल्यांच्या रेल्वेत तर खचून गर्दी असते. भारतीय रेल्वेने मोठी कात टाकली आहे. आता नवनवीन रेल्वे ताफ्यात येत आहे. नवीन रेल्वे लाईन सुरु होत आहे. रेल्वे अपघाताचे प्रमाण पण देशात दिसून येते. गेल्या दोन वर्षांत मोठ्या रेल्वे अपघाताने देशाला हदरवले आहे. 19 मे 2024 रोजी शालीमार एक्सप्रेसवर लोखंडी खंबा पडला. त्यात 3 यात्रेकरु जखमी झाले होते. रेल्वे प्रवाशांसाठी विम्याची सुविधा पण देते. अवघ्या 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा देण्यात येतो.

रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स

भारतीय रेल्वे, प्रवाशांसाठी रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स देते. विम्याचा लाभ त्या प्रवाशांना मिळतो. जे तिकीट बुक करताना विम्याचा पर्याय निवडतात. अनेक प्रवाशांना या विम्याविषयीची माहिती नसते. तिकीट खरेदी करताना हा विमा खरेदी करावा लागतो. तरच त्याचा फायदा प्रवाशांना मिळतो. या विम्यासाठी प्रवाशांना केवळ 45 पैसे मोजावे लागतात.

हे सुद्धा वाचा

काय आहे हा विमा

रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स, रेल्वेचा प्रवास विमा, त्या प्रवाशांना मिळतो, जे ऑनलाईन तिकीट बुक करतात. जर कोणी प्रवाशी ऑफलाईन, म्हणजे तिकीट खिडकीवरुन तिकीट बुक करत असेल तर त्याला विम्याचा लाभ मिळत नाही. विमा घ्यायचा की नाही, हे पूर्णपणे प्रवाशांवर अवलंबून असते. प्रवाशाला वाटले तर तो विमा नाकारु पण शकतो. रेल्वे विम्यासाठी 45 पैसे प्रीमियम आहे. जनरल कोच वा डब्ब्यांतील प्रवाशांना विम्याचा लाभ देण्यात येत नाही. रेल्वे अधिनियम 1989 चे कलम 124 आणि 124 A अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम निश्चित होते.

  1. रेल्वेतील दुर्घटनेवेळी मृत्यू ओढावल्यास भरपाई म्हणून 5 लाख रुपये, गंभीर जखमीला 2.5 लाख रुपये तर किरकोळ जखमीला 50 हजारांची मदत देण्यात येते.
  2. अनुचित प्रकारामुळे मृत्यू ओढावल्यास 1.5 लाख रुपये, गंभीर दुखापत झाल्यास 50 हजार तर किरकोळ जखमीला पाच हजार रुपये भरपाई देण्यात येते.
  3. दुर्घटनेवेळी विम्याची रक्कम पण देण्यात येते. ऑनलाईन तिकीट बुकिंगवेळी प्रवाशी हा पर्याय निवडू शकतो. अपघातात मृत्यू झाल्यास वारसाला 10 लाख रुपये मिळतात.
  4. तर पूर्णतः अपंगत्व आलेल्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचा विमा मिळतो. दुर्घटनेमुळे आंशिक अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला 7.5 लाख रुपये विम्या पोटी देण्यात येतात. तर जखमी आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास दोन लाख रुपये देण्यात येतात.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.