खूशखबर ! आता लग्नाच्या वऱ्हाडासाठीही करता येणार रेल्वे बूक, जाणून घ्या आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया
रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच विविध योजना आणत असते. आता अशीच एक नवी योजना रेल्वे विभागाच्या वतीने बनवण्यात आली आहे. या नव्या योजनेमुळे तुम्हाला आता लग्नाच्या वऱ्हाडासाठी देखील रेल्वेचे बुकिंग करता येणार आहे.
नवी दिल्ली : लग्नाचे वऱ्हाड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊण जाणे हा खर तर चिंतेचा विषय असतो. त्यासाठी सेप्रेट खासगी वाहनांची सोय करावी लागते. साखगी वाहनांकडून जादा दर आकारले जातात. मात्र आता वऱ्हाडाच्या प्रवासाची चिंता करण्याची गरज उरलेली नाही. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना अगदी स्वस्तात, सुरक्षीत आणि आरामदायी प्रवास घडवून आणू शकता. भारतीय रेल्वेने आता ग्रूप तिकिटाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने सुरू केलेल्या या नव्या सुविधेमुळे आता वऱ्हाड देखील रेल्वेने घेऊ जाता येणे शक्य होणार आहे. तसेच जे आपले कुटुंब, नातेवाईकांसोबत पर्यटनाचा आनंद घेऊ इच्छिता अशांना देखील या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रुप तिकिटांची मर्यादा वाढवली
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आता ही सुविधा ग्राहकांसाठी देशातीस सर्व आरक्षण केंद्रावर उलब्ध असणार आहे. रेल्वेकडून पूर्वीपासूनच आपल्या ग्राहकांना ग्रुप तिकिटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र यासाठी केवळ 20 प्रवाशांची मर्यादा होती. मात्र आता ही मर्यादा वाढून रेल्वे विभगाने 100 एवढी केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, आता आपल्या नातेवाईंकासोबत एकाचवेळी प्रवास करणे शक्य होणार आहे.
फयदा कोणाला होणार?
रेल्वे विभागाकडून आपल्या ग्राहकांना आता ग्रुप तिकिटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वेच्या या नव्या योजनेनुसार ग्राहकांना आता एकाच वेळी 100 पेक्षा अधिक तिकिट बूक करणे शक्य होणार आहे. या नव्या सुविधेचा लाभ विशेष: ज्या प्रवाशांना आपल्या नातेवाईकांसोबत अथवा आपल्या कुटुंबासोबत पर्यटन करण्याची इच्छा आहे, अशा लोकांना होणार आहे. त्याचप्रमाणे ग्रुप तिकिट सुविधामुळे लग्नाचे वऱ्हाड देखील कमी खर्चामध्ये एखा ठिकाणावरून दूसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. देशातील सर्व आरक्षण केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
जीवन विमा पॉलिसी 40 टक्क्यांनी झाली महाग, कोणत्या विमा कंपनीने किती वाढविले दर?
शेअर बाजारात या स्टॉकमध्ये कमाईची संधी, या स्टॉकमध्ये आज दिसू शकते तेजी
Share Market | शेअर मार्केटच्या 5 गोष्टी, ज्यावर आज दिवसभर लक्ष ठेवायलाच हवं