Railway Rules: रेल्वेकडून प्रवाशांचे ‘लाड बंद!’ स्वतःचे,सोबतच्यांचे आणि आता उरलं सुरलं अधिकच्या सामानाचेही द्यावे लागणार पैसे, नवे नियम!
दूरचा प्रवास असेल तर, सर्वसामान्य माणूस अद्यापही रेल्वेचाच सोयीस्कर पर्याय स्विकारतांना दिसतो. प्रवासादरम्यान, आपल्याला अनेक सुविधांचा वापर करता येतो. रेल्वेत सामान ठेवण्यास भरपूर जागा असल्याने, आरामदायक प्रवास होतो. परंतु, आता ते शक्य होणार नाही. रेल्वेने याबाबत नवीन नियम तयार केले आहेत.
देशातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे नेहमीच लोकांची विशेष पसंती (Special Preference) राहिली आहे. सोयीस्कर असण्यासोबतच ते प्रवाशांना अनेक सोयी सुविधा देखील प्रदान करताता. तुम्ही फ्लाइटपेक्षा ट्रेनमध्ये जास्त सामान घेऊन जाऊ शकता. रेल्वेत सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी भरपूर जागाही उपलब्ध असते त्यामुळे, प्रवाश्यांना सोयीस्कर रित्या दूरचा प्रवास करता येतो. परंतु, आता तसे होणार नाही. कारण रेल्वेने सामानावर मर्यादा (Limit On Luggage) आणली आहे. प्रवाशी आता हवे तेवढे सामान सोबत नेऊ शकत नाहीत. अधिक सामान वाहून न्यायचे असेल तर, त्याचे अतिरीक्त शुल्क रेल्वे प्रशासनाला अदा करावे लागेल असा नियम रेल्वे तर्फे सुरू करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry Of Railways) याबाबत ट्विट् करून, लोकांना माहिती दिली आहे. प्रवासादरम्यान अधिक सामान असेल तर, तुमचा प्रवासाचा आनंदही अर्धा होईल असा इशारा या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाने दिला आहे.
काय आहे रेल्वेचे ट्विट
रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून लोकांना प्रवासादरम्यान जास्त सामान घेऊन प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाने सांगितले की, “जास्त सामान असेल तर प्रवासाचा आनंद अर्धा होईल! जास्त सामान घेऊन ट्रेनने प्रवास करू नका. सामान जास्त असेल तर पार्सल ऑफिसमध्ये जाऊन सामानाची पूर्वनोंदणी करा.”
काय आहेत सामानाबाबत नियम…
भारतीय रेल्वेच्या सामानाच्या नियमांनुसार, ट्रेनच्या प्रवासादरम्यान प्रवासी फक्त 40 ते 70 किलो सामान सोबत घेऊन जाऊ शकतील. त्यापेक्षा जास्त सामान घेऊन कोणी प्रवास केल्यास त्याला तिकीटीबरोबर सामानाचेही वेगळे भाडे द्यावे लागेल. रेल्वेच्या डब्यानुसार सामानाचे वजन वेगळे असून, त्यानुसार रेल्वेप्रशासनातर्फे सामान भाडे आकारले जाणार आहे.
मी कोणत्या डब्यात किती सामान नेऊ शकतो?
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, स्लीपर क्लासमध्ये प्रवासी 40 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतात. त्याच वेळी, एसी डब्यात 50 किलो सामान नेण्याची सूट आहे. फर्स्ट क्लास एसीमध्ये प्रवासी ७० किलोपर्यंतचे सामान घेऊन जाऊ शकतील. अशा वेळी अधिक सामान असल्यास, तुम्हाला एसी डब्याचे अतिरीक्त भाडे मोजावे लागू शकते.
जर सामान जास्त असेल तर काय
रेल्वेने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा तुमचे सामान जास्त असल्यास प्रवाशांकडून काही शुल्क आकारले जाऊ शकते. अशा स्थितीत रेल्वेच्या पार्सल सुविधेचा लाभ घेता येईल. या अंतर्गत, सामानाचे भाडे भरून तुम्ही आपले सामान रेल्वेने वाहून नेऊ शकता.
या सामानावर आहे बंदी
स्टो, गॅस सिलिंडर, कोणतेही ज्वलनशील रसायन, फटाके, ऍसिड, दुर्गंधीयुक्त वस्तू, चामडे किंवा ओले कातडे, पॅकेज केलेले तेल, वंगण, तूप, वस्तू ज्यांच्या तुटण्यामुळे किंवा टपकल्याने रेल्वे प्रवासादरम्यान वस्तू किंवा प्रवाशांना नुकसान होऊ शकते. अशा वस्तू प्रवासादरम्यान नेता येणार नाहीत. रेल्वे प्रवासादरम्यान प्रतिबंधित वस्तू बाळगणे हा गुन्हा मानला जातो. प्रवासादरम्यान तुम्ही या प्रतिबंधित वस्तूंमधील कोणत्याही प्रकारची वस्तू सोबत घेऊन जात असाल, तर तुमच्यावर रेल्वे कायद्याच्या कलम 164 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.