RBI Alert : कोणालाही शेअर करु नका ही माहिती, नाही तर बँक खाते होईल रिकामे

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आर्थिक व्यवहार करणारे ग्राहक फिशिंगचा सहज शिकार होतात. त्यामुळे आरबीआयने अशा ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यात ग्राहकांनी त्यांचा ओटीपी, पिन आणि सीव्हीव्ही क्रमांक शेअर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

RBI Alert : कोणालाही शेअर करु नका ही माहिती, नाही तर बँक खाते होईल रिकामे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाImage Credit source: Wikipedia
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:37 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) सध्या वाढत असलेल्या डिजिटल फसवणुकीविरोधात व्यापक प्रचार मोहिम हाती घेतली आहे. या डिजिटल युगात टेक्नोसॅव्ही ग्राहक ऑनलाईन आणि डिजिटल मोडद्वारे पैसे अदा करण्याच्या पद्धतीला मोठ्या प्रमाणात पसंती देत आहे. यातूनच त्यांची फिशिंग आणि इतर महत्वपूर्ण माहिती चोरुन सहज शिकार करण्यात येत आहे. त्यामुळे आरबीआयने ग्राहकांना त्यांचा ओटीपी (OTP), क्रेडिट अथवा डेबिट कार्डमागील तीन अंकी सीव्हीव्ही क्रमांक (CVV) आणि व्यवहारासाठी आवश्यक पिन क्रमांक (PIN) कोणालाही शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. आरबीआयने याविषयीची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात फसवणूक करणारे लोकांची कमाई फस्त करण्यासाठी टपलेले असल्याने ग्राहकांनी अधिक सतर्कतेने व्यवहार करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.

जनहितार्थ प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेत रिझर्व्ह बँकेने फसवणुकीचे प्रकार, त्यासाठी वापरण्यात येणारे हातखंडे, फिशिंग, त्यासाठी करण्यात आणि वापरण्यात येणा-या युक्त्या यांची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच या फसवणुकीपासून ग्राहकांनी स्वतः कसे वाचावे, ग्राहकांनी माहिती कशी गुप्त ठेवावी, आमिष दाखविणारे फोन कॉल्स आणि एसएमएस, ई-मेल्स यापासून कसे वाचावे, सतर्कता कशी ठेवावी याची सविस्तर माहिती दिली आहे.

कोणालाही देऊ नका ही माहिती

केंद्रीय बँकेने फसवणुक प्रकारणांचा सखोल अभ्यास केल्यानंतर ही पुस्तिका ग्राहकांसाठी तयार केली आहे. व्यवहार करताना पुरेशी काळजी न घेतल्यास अथवा निष्काळजीपणे व्यवहार केल्यास अनेकदा ग्राहकाला नाहक फिशिंगचा बळी पडावे लागते. एक छोटीशी चूकही तुमचे लाखोंचे नुकसान करु शकते. तुम्ही कष्ट करुन अर्जीत केलेली रक्कम भामटे सहज उडवून नेतात. या धोका धडी पासून वाचण्यासाठी ग्राहकांनी त्यांचा ओटीपी , क्रेडिट अथवा डेबिट कार्डमागील तीन अंकी सीव्हीव्ही क्रमांक आणि व्यवहारासाठी आवश्यक पिन क्रमांक कोणालाही सामायिक न करण्याचे ( Don’t Share) आवाहन केले आहे. तसेच याविषयीची माहिती आप्तस्वकिय आणि मित्रांना देण्याचे आणि त्यांना या फसवणुकीपासून वाचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

होऊ नका सावज, राहा सावध

फोन कॉल्स अथवा मॅसेजद्वारे दिशाभूल करुन ग्राहकांकडून त्यांचा पासवर्ड,ओटीपी,पिन,सीव्हीव्ही ही माहिती घेण्यात येते. आकर्षक योजना, आमिष दाखवून, दंड टाळण्यासाठी माहिती देत असल्याचे अथवा बँक कर्मचारी असल्याचे भासवून अथवा इतर अधिकारी बोलत असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात येते. ई-मेल्सवर अद्यात येणा-या लिंक्स, आकर्षक योजनांचे येणारे ई-मेल्स आणि त्यात विचारलेली माहिती डोळेझाकून भरल्यास तुम्हची आर्थिक फसवणूक होऊ शकते

संबंधित बातम्या :

आणखी एका सहकारी बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, बँकेचा परवाना रद्द; चेक करा तुमचे खाते तर ‘या’ बँकेत नाहीना?

बँकेतील कामे आजच पूर्ण करा, मार्च महिन्यात बँकांना तेरा दिवस सुटी

फाटलेल्या नोट बदलण्यासाठी करावी लागणार नाही आता धावपळ, आरबीआयने केले नवीन नियम जाहीर !

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.