मान्सूनची आनंद पेरणी, महागाई वरुणधारेत विरघळणार! भारती उद्योग महासंघाला विश्वास

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे, तर दुसरीकडे मान्सूनने अंदमानातून आनंदवार्ता पेरली आहे. त्यामुळे महागाई या वरुणधारेत विरघळून जाईल आणि आटोक्यात येईल असा विश्वास भारतीय उद्योग महासंघाने व्यक्त केला आहे.

मान्सूनची आनंद पेरणी, महागाई वरुणधारेत विरघळणार! भारती उद्योग महासंघाला विश्वास
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 10:58 AM

भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) बेंचमार्क ऋण दरात (Repo Rate) वाढ केली आहे. तर दुसरीकडे मान्सूनने (Monsoon) अंदमान बेटावर दस्तक दिल्याने देशभरात आनंदवार्ता पेरली गेली आहे. त्यामुळे भडकलेल्या महागाईवर पावसाचा अभिषेक होऊन ती आटोक्यात येईल. महागाई या वरुणधारेत विरघळून जाईल असा विश्वास भारतीय उद्योग महासंघाने CII व्यक्त केला आहे. महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजीव बजाज यांनी सोमवारी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महागाई आणि आरबीआयच्या कर्ज दराविषयी भाष्य केले. आरबीआयने रेपो दरात केलेली वाढ पथ्यावर पडून महागाई कमी होण्यास मदत मिळेल. ग्राहकांना या वाढत्या व्याजदरांचा फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सोबतच देशभरात यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे संकेत महागाईला आटोक्यात आणण्यासाठी मदत करतील. वर्षाच्या सहामाहीत नियोजनकर्त्यांना मुद्रास्फीती आणि व्याज दरांबाबत निर्णय घेण्यास सहकार्य मिळेल असे देखील त्यांनी म्हटले आहे. मागणी आणि पुरवठा यांच्या परस्पर पुरक स्थिती पाहता केंद्रीय बँकेने मुद्रास्फीती दर वाढण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने पहिल्यांदा व्याज दरांमध्ये वाढ करण्याच्या चक्राला गती दिली आहे. त्यामुळे आता  भविष्यात पुन्हा व्याज दर वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकल देशातंर्गत उत्पादन वृद्धी दर 8.2 टक्क्यांच्या घरात

देशाची केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ करुन त्यांचा रोख स्पष्ट केला आहे. अपेक्षा आहे की, येत्या काही दिवसांत बँक अशीच दरवाढ कायम ठेवेल अंस बजाज यांनी म्हटले आहे. महासंघाच्या अंदाजानुसार भारताचे सकल देशातंर्गत उत्पादन दरात (GDP) वृद्धी होईल. हा वृद्धी दर 7.4 ते 8.2 टक्क्यांच्या दरम्यान राहील. परंतू, या वृद्धीवर  कच्च्या तेलाचे बंधन राहील. त्याआधारे हा वृद्धी दर कमी जास्त होऊ शकतो.

महागाईने उच्चांकी पातळी गाठली

वाचकांना माहितीच आहे की, देशातील किरकोळ महागाई गेल्या आठ वर्षातील सर्वात उच्चांकी पातळीवर पोहचली आहे. महागाईने सर्वसामान्य नागरिकांसह उच्च मध्यमवर्गीय वर्ग ही हैराण झाला आहे. आकड्यांनी महागाईची पोलखोल केली आहे. देशातील किरकोळ महागाई दर 7.79 टक्क्यांवर पोहचला आहे. खाद्य पदार्थांच्या किंमतीतील वाढ आणि तेलाच्या भडकलेल्या भावाने महागाई तिच्या उच्चांकी पातळीवर पोहचली आहे. यापूर्वी 2014 साली महागाई तिच्या उच्चांकी पातळीवर पोहचलेली होती. मे 2014 मध्ये महागाई दर 8.33 टक्क्यांवर होता. हा सलग चौथा महिना आहे, ज्या कालावधीत महागाईने रिझर्व्ह बँकेच्या अंदाजाला आपटी देऊन उच्चांकी पातळी गाठली आहे.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.