Mutilated Notes RBI : आता अर्धी नोटही करणार कमाल! आरबीआयने घेतला हा निर्णय
Mutilated Notes RBI : फाटक्या, जीर्ण नोटांबाबत यापूर्वीच भारतीय केंद्रीय बँकेने नियम केलेले आहेत. पण केवळ अर्धी नोट असेल तर ? नोटेचा अर्धाच तुकडा तुमच्याकडे असेल तर काय होईल? भारतीय रिझर्व्ह बँकेने याविषयी एक मोठा घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : खिशातील फाटक्या, जीर्ण नोटा (Damage Notes) कोणीही घेत नाही. नोटा खिशात कोंबून कोंबुन कोंबुन खूप मळतात. त्या खराब होतात, एकवेळ अशी येते की या नोटा चलनात कोणीच घेत नाहीत. नोटांच्या गड्डीत नोट कोंबुन वेळ मारुन नेण्याचे प्रकार होतात. पण तरीही अनेकदा अशा नोटा समोर येतातच. त्यांना बाजारात कोणीही घेत नाही. दुकानदार, व्यापारी, बस कंडक्टर आणि इतर ठिकाणी या नोटा घेण्यास नकार मिळतो. आरबीआयने फाटक्या, जीर्ण नोटा बदलविण्यासाठी नियम (Exchange of Damage Notes) केलेला आहे. खराब नोटा बँकेत बदलल्या जातात. पण माहिती नसल्याने अनेक जण बँकेत नोटा बदलविण्यासाठी जात नाहीत. ते दलालांकडे जातात आणि कमी पैशात नोटा बदलवून घेतात.
जर तुमच्याकडे फाटक्या, जीर्ण, मळक्या, जुन्या नोटा असतील तर या नोटा तुम्हाला बँकेत जाऊन बदलविता येतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर बँक नोट बदलविण्यास नकार देत असेल तर त्या बँक आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते. बँकेद्वारे फाटक्या नोटा बदलवून मिळत नसतील, तर ग्राहकांना आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करता येते.
केंद्रीय बँकेने याविषयीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, फाटक्या नोटा बदलण्यासाठी एक निश्चित कालावधी असतो. एक व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलवू शकते. पण त्यांची एकूण किंमत 5 हजार रुपयांहून अधिक नको. तर पूर्णपणे जळालेली नोट, फाटक्या नोटा बदलविण्यात येणार नाही. या नोटा तुम्हाला थेट आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये जमा करता येतात.
फाटक्या नोटा बदलविताना त्या किती जीर्ण, फाटक्या आहेत, त्यावर रक्कम निश्चित करण्यात येते. 2000 रुपयांची नोट 88 वर्ग सेंटीमीटर असेल तर त्याची पूर्ण किंमत मिळते. तर 44 वर्ग सेंटीमीटर नोट असेल तर अर्धी रक्कम देण्यात येते. जर 200 रुपयांच्या फाटक्या नोटेचा 78 वर्ग सेंटीमीटर भाग सुरक्षित असेल तर पूर्ण पैसे मिळतील. पण नोट 39 वर्ग सेंटीमीटर असेल तर अर्धीच रक्कम मिळेल.
जर तुमच्याकडे 5, 10, 20 अथवा 50 रुपयांच्या फटक्या नोटा असतील. तर या नोटांचा अर्धा हिस्सा तरी असणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर तुम्ही नोट बदलू शकत नाही. जर फाटक्या नोटांची संख्या 20 हून अधिक असतील आणि त्यांचे मूल्य 5 हजार रुपयांपेक्षा अधिका असेल तर तुम्हाला या नोटा बदलण्यासाठी काही शुल्क जमा करावे लागेल.
जर तुमच्याकडे नोटांचे अनेक तुकडे असतील तर त्यांना ही नोट बदलता येतात. अर्थात या नोटा बदलण्याची प्रक्रिया थोडी कठिण आहे. या नोटांना रिझर्व्ह बँककडे पोस्टामार्फत पाठवू शकता. त्यासोबत तुमचे बँक खाते क्रमांक, खात्याचे नाव, IFSC कोडची माहिती द्यावी लागेल.