RBI : रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय तुम्हाला पडणार महागात..ऐन सणासुदीत खिश्यावर येणार ताण..

RBI : RBI येत्या आठवड्यात पुन्हा एक मोठा निर्णय घेणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्यावर पुन्हा बोजा पडण्याची भीती आहे.

RBI : रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय तुम्हाला पडणार महागात..ऐन सणासुदीत खिश्यावर येणार ताण..
खिश्यावर पडणार भारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 6:00 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठी उपाय करणारा असली तरी त्यामुळे तुमच्या खिश्यावर भार पडणार आहे. तुम्हाला महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहे. जगभरातील अनेक केद्रीय बँकांनी महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर (Interest Rate) वाढवले आहेत.

RBI महागाईला चित्त करण्यासाठी रणनीती आखत आहे. केंद्रीय बँक लवकरच रेपो दरात वाढ करणार आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने आणि इतर केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवले. त्यानंतर आरबीआय ही व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक येत्या शुक्रवारी सलग चौथी व्याज दर वाढ करण्याची दाट शक्यता आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने आतापर्यंत रेपो दरात 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता पुन्हा व्याजदर वृद्धीने जनता हैराण होणार आहे.

हे सुद्धा वाचा

रेपो दर चार टक्क्यांहून वाढून आता 5.40 टक्क्यांवर पोहचला आहे. पतधोरण समितीची (MPC) 30 सप्टेंबर रोजी बैठक होण्याची शक्यता असून रेपो दरात 0.50 टक्क्यांची वृद्धी अपेक्षित आहे. असा निर्णय झाल्यास रेपो दर 5.90 टक्के होईल. त्यामुळे कर्ज पुन्हा महाग होईल आणि कर्जावरील ईएमआयमध्ये सुद्धा वाढ होईल.

रेपो दरात मे महिन्यात 0.40 टक्क्यांची वृद्धी झाली होती. तर जून आणि ऑगस्ट महिन्यात रेपो दरात 0.50-0.50 टक्क्यांची वाढ झाली. ग्राहक मूल्य सूचकांकवर आधारीत किरकोळ महागाई दर ऑगस्ट महिन्यात सात टक्क्यांवर पोहचला आहे. पतधोरण समिती या किरकोळ महागाई दरावर लक्ष ठेऊन असते.

आरबीआय गव्हर्नरच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक बुधवारपासून सुरु होत आहे. रेपो दराबाबत येत्या शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी निर्णय होईल. रेपो दरात किती वाढ होईल याची माहिती मिळेल. जर रेपो दरात जास्त वाढ झाली नाही तर महागाई आटोक्यात येण्याचा विश्वास आरबीआयला आहे, असे स्पष्ट होईल.

पालकमंत्रीपदावरून अद्याप महायुतीत नाराजी, झिरवाळांकडून खदखद व्यक्त
पालकमंत्रीपदावरून अद्याप महायुतीत नाराजी, झिरवाळांकडून खदखद व्यक्त.
'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल
'तो ठणठणीत, रिपोर्ट नॉर्मल'; कराडच्या तब्येतीवरून दमानियांचा सवाल.
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?
'पुन्हा उपोषणाची नौटंकी, आकाचे आदेश?', जरांगेंवर भाजप नेत्याची टीका?.
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण
उचलून आदळलं, बेदम मारलं... NCPच्या नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण.
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?
'...सरकारची तयारी सुरू', लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले मनोज जरांगे?.
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?
निकषबाह्य अन् अपात्र 'लाडक्या बहिणीं'चे पैसे सरकार परत घेणार?.
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'
पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, 'माझी इच्छा होती, पण...'.
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ
उदय सामंत महाराष्ट्राचे तिसरे DCM? संजय राऊतांच्या 'त्या' दाव्यान खळबळ.
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?
आकाला मिळाला दवाखाना अन् खतऱ्यात आला खजिना, कराडची संपत्ती होणार जप्त?.
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय
गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी; पुण्यात 73 रूग्ण, दादांची माहिती काय.