पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा व्हिडीओ होतोय व्हायरल; व्हिडीओमधील दावा खरा आहे का?, आरबीआयने दिले स्पष्टीकरण

तुमच्याही पाहाण्यात पाचशे रुपयांच्या नोटांचा तो व्हिडीओ आला आहे का? ज्या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाचशे रुपयांच्या नोटेवर असलेली हिरवी पट्टी ही आरबीआय गव्हर्नरच्या सहीजवळ असल्यास ती नोट बनावट असते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आरबीआयकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा व्हिडीओ होतोय व्हायरल; व्हिडीओमधील दावा खरा आहे का?, आरबीआयने दिले स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 10:12 AM

नवी दिल्ली : तुमच्याही पाहाण्यात पाचशे रुपयांच्या नोटांचा तो व्हिडीओ आला आहे का? ज्या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाचशे रुपयांच्या नोटेवर असलेली हिरवी पट्टी ही आरबीआय गव्हर्नरच्या सहीजवळ असल्यास ती नोट बनावट असते. ही पट्टी नेहमी नोटेवर असलेल्या गांधीजींच्या फोटोजवळच असायला हवी. तुम्ही जर हा व्हिडीओ पाहिला असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. पीआबी फॅक्ट चेकने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. हा व्हिडीओ बनावट असल्याचे पीआबीने सांगितले आहे.

काय आहे व्हिडीओमधील दावा?

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. ज्या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाचशे रुपयांच्या नोटेवर असलेली हिरवी पट्टी ही महात्मा गांधींच्या फोटोजवळ पाहिजे. ती जर गव्हर्नरच्या सहीजवळ असेल अशा नोटा या बनावट असतात. मात्र या व्हिडीओमध्ये तथ्य नसून, या दोनही नोटा बनावट नसल्याचे मध्यवर्ती बँकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच अफवा पसरवण्याच्या उद्देशाने हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडीओवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील आरबीआयच्या वतीने करण्यात येत आहे.

अशा ओळखा बनावट नोट 

बनावट नोट कशी ओळखावी यासाठी आरबीआयच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. आपण साईटवरून ही माहिती  मिळवू शकतो. तुम्हाला बनावट नोट ओळखायची असल्यास ही नोट लाईटसमोर धरावी, त्यामध्ये तुम्हाला माहत्मा गांधींचा वाटरमार्क दिसून येईल. वाटरमार्क असल्यास ही नोट खरी आहे असे समजावे. वॉटरमार्क न दिसल्यास ही नोट बनावट असते. तसेच आता नवीन नोटांवर करण्यात आलेली प्रिंटिंग देखील जुण्या नोटांपेक्षा वेगळी आहे, त्याचा उपयोग करून देखील आपण नोटी खरी आहे की खोटी हे ओळखू शकतो.

संबंधित बातम्या 

इंधनाचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

‘या’ तीन बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर मिळतोय चांगला परतावा; पहा किती आहे व्याजदर

‘एससीएसएस’मध्ये गुंतवणूक केल्यास होईल मोठा फायदा; जाणून घ्या काय आहे योजना?

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.