RD Vs SIP : आरडी की एसआयपी, कोण करेल पाच वर्षांत मालामाल

RD Vs SIP : गुंतवणूक करताना ती डोळसपणे करणे फायद्याची ठरते. पारंपारिक गुंतवणूक पद्धतीपेक्षा म्युच्युअल फंड किती फायद्याचा ठरतो. किती मोठा फायदा होतो, गणित काय सांगते.

RD Vs SIP : आरडी की एसआयपी, कोण करेल पाच वर्षांत मालामाल
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 4:18 PM

नवी दिल्ली : 1 जुलैपासून टपाल कार्यालयाने आवर्ती ठेव योजना (Recurring Deposit Scheme) , आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. आता या सरकारी गुंतवणूक योजनेवर 6.5 टक्क्याने व्याज दर मिळले. यापूर्वी हा व्याजदर 6.2 टक्के होता. पोस्ट खात्यातील (Post Office) आरडी मध्ये गुंतवणूक आता फायद्याची ठरली आहे. पोस्ट खात्यातील आरडी 5 वर्षांसाठी असते. या योजनेत हमीपात्र परतावा मिळतो. तसेच ही गुंतवणूक जोखीममुक्त तर आहेच पण केंद्र सरकार तुमच्या गुंतवणुकीची हमी घेते. तर म्युच्युअल फंडात (Mutual Fund) आता SIP द्वारे गुंतवणुकीचा पर्याय सर्रास वापरण्यात येतो. या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो. पण किती परतावा मिळेल याची कोणतीच हमी नसते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारावर आधारीत असते. गुंतवणूक करताना ती डोळसपणे करणे फायद्याची ठरते. पारंपारिक गुंतवणूक पद्धतीपेक्षा म्युच्युअल फंड किती फायद्याचा ठरतो. किती मोठा फायदा होतो, गणित काय सांगते.

5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती फायदा जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दर महिन्याला 5000 रुपयांची आरडी सुरु केली तर एका वर्षात तुम्ही 60,000 रुपये आणि 5 वर्षांत एकूण 3,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल. 6.5 टक्के व्याजाच्या आधारे या नियोजीत गुंतवणुकीवर तुम्हाला एकूण 54,957 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवेळी तुम्हाला व्याज आणि मुळ रक्कम मिळून एकूण 3,54,957 रुपये परतावा मिळेल.

5000 रुपयांच्या SIP वर किती परतावा ? म्युच्युअल फंडात SIP द्वारे अथवा एकरक्कमी भरुन गुंतवणूक करता येते. तुम्ही दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर आवर्ती ठेव योजने इतकीच रक्कम जमा होईल. पण याठिकाणी परताव्याचे गणित बदलून जाते. एसआयपीत सरासरी 12 टक्केप्रमाणे परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

परताव्याचे गणित बदलणार एकूण 3,00,000 रुपये जमा होतील. त्यावर 12 टक्के व्याज मिळेल. त्यानुसार, व्याजापोटी 1,12,432 रुपये मिळतील. मुळ रक्कम आणि व्याजाचा एकत्रित विचार केला तर 5 वर्षांत एकूण 4,12,432 रुपये परतावा मिळेल. गणितानुसार, आरडीपेक्षा एसआयपीत दुप्पट परतावा मिळेल. विशेष म्हणजे सरासरीपेक्षा म्युच्युअल फंडात अधिकचा परतावा मिळू शकतो.

ही गोष्ट ठेवा ध्यानात पोस्टाच्या आरडीत तुम्हाला सलग गुंतवणूक करावी लागते. ती अचानक बंद करता येत नाही. कालावधी पूर्ण होईपर्यंत ती सुरु ठेवावी लागते. तीन वर्षानंतर तुम्ही आरडी बंद करु शकता. पण त्यावेळी व्याजदराचा फटका बसतो. तुम्हाला आरडीच्या व्याजदराप्रमाणे नाही तर नियमीत बचत खात्यावरील व्याजदरानुसार व्याज मिळते. इथे तुमचे नुकसान होते. एसआयपी तुम्ही कधी पण बंद करु शकता. ती रक्कम न काढता कायम ठेवली तरी त्यावर काही वर्षांत चांगला परतावा मिळतो.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.