RD rates in Banks: कोणत्या बँकेत RDसाठी जादा व्याजदर? ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठे गुंतवणूक चांगली, जाणून घ्या
आरडी कोणत्या बँकेत काढावी आणि कोणत्या बँकेत काढू नये, यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. यावरुन अनेक चर्चा रंगतात. दरवर्षी आरडीचे दर बदलत असतात.
मुंबई : रिकरींग डिपॉझिट म्हणजेच आरडी (RD Rates). अनेक वर्षांपासून आरडी करण्याला लोकं प्राधान्य देतात. हा एक दैनंदिन आणि शिस्तबद्ध असा गुंतवणुकीचा आणि पैसे वाचवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिला जातो. मात्र हा पर्याय निवडत असताना कोणत्या बँक आरडीवर किती व्याज देते आहे, यालाही महत्त्व प्राप्त होतं. त्यासाठी आरडी कोणत्या बँकेत (Banks in India) काढावी आणि कोणत्या बँकेत काढू नये, यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. यावरुन अनेक चर्चा रंगतात. दरवर्षी आरडीचे दर बदलत असतात. या बदलणाऱ्या दरांप्रमाणे कोणत्या बँकेत आरडी काढावी, यावरचा निर्णयही बदलत राहणंही स्वाभाविकच आहेत. अनेक बँकांमध्ये आरडीवर ज्येष्ठ नागरिकांना हा सामान्य नागरिकांच्या तुलनेत जास्त व्याजदर आरडीवर दिला जातो. नियमित योजनांव्यतिरीक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior citizens), महिलांसाठीही अनेकदा वेगवेगळ्या योजना बँकांकडून जाहीर केल्या जात असतात. एक ते पाच वर्षांची आरडीवर चार टक्क्यांपासून ते 6.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जातो. चला तर जाणून घेऊयात, अशाच काही महत्त्वपूर्ण व्याजदरांबाबत…
RDसाठी कोणत्या बँकेत किती व्याजदर?
- इलाहाबाद बँक – एका वर्षासाठी व्याजदर 6.25 ते 6.45%
- एक्सिस बँक – ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.65-6.50% सामान्य ग्राहकांसाठी 4.40 5.75%
- HDFC बँक – ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.90 ते 6.25 टक्के सामान्य ग्राहकांसाठी 4.40-5.50 टक्के
- ICICI बँक – ज्येष्ठ नागरिकांसाठी 4-6.30% सामान्य ग्राहकांसाठी 4.30-5.10%
- बँक ऑफ इंडिया – ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.85-5.55% सामान्य ग्राहकांसाठी 4.35-5.05%
- बँक ऑफ महाराष्ट्र – ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.50-5.40% – सामान्य ग्राहकांसाठी 4-4.90%
- कॅनरा बँक – ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.90-5.75% – सामान्य ग्राहकांसाठी 4.40-5.25%
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया – सामान्य ग्राहकांसाठी 4.25-5.00%
- सिटी बँक – ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.20-4% – सामान्य ग्राहकांसाठी 2.75-3%
- सिटी यूनियन बँक – ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.75-5.00% – सामान्य ग्राहकांसाठी 3.75-5.00%
- स्टेंट बँक – ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.90-6.20% सामान्य ग्राहकांसाठी – 4.40-5.40%
- आंध्र बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.90-5.65% सामान्य नागरिकांसाठी – 4.40-5.15%
- बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.25-5.75% सामान्य नागरिकांसाठी – 4.50-5.00%
कामाच्या इतर बातम्या :
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात दुधाचे दर तब्बल 10 रुपयांनी वाढले? महागाईनं जगणं बेहाल!
राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी Summer Special ट्रेन, वाचा सविस्तर
परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे का काढतायेत?, जाणून घ्या कारण