LIC विमा धारकांसाठी अपडेट: एलआयसीच्या 2 पॉलिसीत बदल, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या सुधारित निकष!

भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळाने (LIC) महत्वाच्या दोन विमा पॉलिसीत सुधारणा केल्या आहेत. जीवन अक्षय VII (Jeevan Akshay VII) आणि न्यू जीवन शांती (New Jeevan Shanti) पॉलिसीत बदल केले आहेत.

LIC विमा धारकांसाठी अपडेट: एलआयसीच्या 2 पॉलिसीत बदल, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या सुधारित निकष!
एलआयसी विमा धारकांसाठी महत्त्वाची बातमी
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 9:57 PM

नवी दिल्ली : कोविडच्या वाढत्या प्रकोपामुळे अर्थ जगतावर अस्थिरतेचं सावट आहे. सामान्य गुंतवणूकदारांत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित व सर्वोत्तम गुंतवणूक परतावा देणाऱ्या पर्यायाच्या शोधात गुंतवणूकदार आहेत. कमी हफ्त्यात अधिक परताव्याच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांना आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पॉलिसीचा पर्याय अनुकूल ठरतो. तुम्ही गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय म्हणून एलआयसी (LIC) विचार करत असल्यास तुमच्यासाठी बातमी महत्वाची आहे. भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळाने (LIC) महत्वाच्या दोन विमा पॉलिसीत सुधारणा केल्या आहेत. जीवन अक्षय VII (Jeevan Akshay VII) आणि न्यू जीवन शांती (New Jeevan Shanti) पॉलिसीत बदल केले आहेत. दोन्ही विमा पॉलिसींच्या अ‍ॅन्युटी दरांत बदल केला आहे. दोन्ही विमा योजना सुधारीत अ‍ॅन्युटी दरांसह एक फेब्रुवारीपासून ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

एलआयसीने आपल्या संकेतस्थळावरुन याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. जीवन शांतीच्या दोन्ही अ‍ॅन्युटी पर्याय अंतर्गत अ‍ॅन्युटी रकमेची गणना एलआयसीच्या वेबसाईटवर उपलब्ध कॅलक्युलेटरच्या सहाय्याने केली जाऊ शकते. विमा पॉलिसी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे उपलब्ध आहेत. तुम्ही एलआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पॉलिसी खरेदी करू शकतात.

डिसेंबर 2021, मध्ये एलआयसीने नवीन विमा पॉलिसी- धन रेखा लाँच केली होती. वैयक्तिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना मानली जाते. धन रेखा पॉलिसीत महिलांसाठी विशेष प्रीमियम दरांची घोषणा केली. प्लॅन नुसार खात्रीशीर लाभ देखील उपलब्ध होतात. धन रेखा पॉलिसी अनुसार, किमान 2 लाखांची विमा रक्कम ठेवली जाऊ शकते. कमाल विमा रकमेची मर्यादा नाही. पॉलिसीच्या अटींनुसार, 90 दिवसाच्या मुलापासून ते 8 वर्षाच्या मुलाच्या नावे घेतली जाऊ शकते. अधिकतम वयाची मर्यादा 35 वर्षांपासून 55 वर्षांपर्यंत आहे.

मृत्यू लाभ:

पॉलिसी कालावधीदरम्यान विमाधारकची मृत्यू झाल्यास विमा रकमेच्या 125 टक्के रक्कम देय केली जाते. उदाहरणातून, समजावून घेऊया- समजा 30 वर्षे वयाच्या वरुणची 10 लाख रुपयांच्या विमा रकमेची पॉलिसी आहे. वरुणला 15 वर्षापर्यंत हफ्ते भरावे लागतील. वरुणने वार्षिक हफ्त्याची निवड केली असल्यास त्याला वार्षिक 73,342 रुपये हफ्ता भरावा लागेल. अशाप्रकारे संपूर्ण पॉलिसी कालावधीदरम्यान वरुणला अंदाजित 11 लाख रुपये द्यावे लागतील.

संबंधित बातम्या :

Share Market : शेअर बाजारात पुन्हा फॉर्मात? सेंन्सेक्समध्ये 695 अंकाची वाढ! बँकिंग स्टॉक्सही वाढले

होमलोन घेणाऱ्यांच्या संख्येत भर! HDFCच्या नफ्यात 11% वाढ, आर्थिक तिमाही अहवाल जाहीर

Income Tax : इनकम टॅक्स जैसे थे आहे की खरंच बदललाय? सोप्या शब्दांत समजून घ्या!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.