Real Estate : रिअल इस्टेटला बूस्टर, घर विक्रीत 83 टक्क्यांनी वाढ; मुंबईत दुप्पटीनं खरेदी

यंदाच्या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत प्रमुख सात शहरांतील घरांच्या विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. चालू तिमाहित घरांच्या विक्रीत 83 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली

Real Estate : रिअल इस्टेटला बूस्टर, घर विक्रीत 83 टक्क्यांनी वाढ; मुंबईत दुप्पटीनं खरेदी
रिअल इस्टेटला बूस्टर !Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 7:03 PM

नवी दिल्लीकोविड काळात रिअल इस्टेट (REAL ESTATE) क्षेत्राची गती मंदावली होती. मात्र, पुन्हा एकदा रिअल इस्टेटनं उर्जितावस्था प्राप्त केल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत प्रमुख सात शहरांतील घरांच्या विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. चालू तिमाहित घरांच्या विक्रीत 83 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली असून घर विक्री संख्या 10,988 वर पोहोचला आहे. कोविड प्रकोपामुळे (COVID CRISIS) अधिक आकारमानाच्या घरात वाढ झाल्याचं चित्र आहे. जेएलएल इंडियानं आज (शुक्रवारी) आकडेवारी घोषित केली. एक वर्षापूर्वी समान कालावधीत 5,994 घराची विक्री झाली होती. प्रॉपर्टी सल्लागार जेएलएल इंडियाने (JLL INDIA) प्रमुख शहरांची तिमाही घरांच्या विक्रीची आकडेवारी सादर केली. बंगळुरु, चेन्नई, पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद शहरांचा समावेश आहे. घर विक्रीची आकडेवारी केवळ अपार्टमेंट (फ्लॅट) संबंधित आहे.

विक्रीची आकडेवारी:

एक ते दीड कोटी रुपयांच्या किंमत श्रेणीतील अपार्टमेंट विक्री संख्.या 6,187 आहे. दीड कोटीहून अधिक किंमतींच्या अपार्टमेंट संख्या 4801 वर पोहोचली आहे. अहवालातील आकडेवारी कोविड पूर्व समान कालावधीशी तुलना केल्यास 148 टक्क्यांनी अधिक आहे.

कोणत्या शहरात किती विक्री-

बंगळुरुमध्ये अपार्टमेंट विक्रीची संख्या 5216 वरुन 12202 वर पोहोचली आहे. दुप्पटीने घराच्या विक्री संख्येत वाढ झाली आहे. चेन्नईत घर विक्री संख्या 3200 वरुन 3450 वर पोहोचली आहे. दिल्लीत देखील घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. विक्री संख्या 5448 वरुन 8633 वर पोहोचली आहे.

मुंबईत दुप्पट, पुण्यात समाधानकारक:

मुंबईमध्ये दुप्पटीनं अपार्टमेंट विक्री नोंदविली गेली आहे. विक्री संख्या 5,779 वरुन 11648 वर पोहोचली आहे. पुण्यात देखील अपार्टमेंट विक्रीच्या संख्येत पाच हजारांनी वाढ झाली आहे. अपार्टमेंट विक्री संख्या 3680 वरुन 8098 वर पोहोचली आहे.

किंमती वाढल्या, खर्च वाढला

सध्या घरांचे भाव सात ते दहा टक्कांनी वाढले आहे. गेल्या दोन वर्षापासून गृहनिर्मिती क्षेत्रातील वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. सिमेंट, कॉपर, तांबे, स्टील सर्वांचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सिमेंटच्या भावात 22 टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. स्टीलच्या किंमती तब्बल 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाढत्या वाहतूक खर्चाचा परिणाम सर्व वस्तूंवर झाला आहे.

गृहनिर्मिती बजेट कोलमडलं

रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी कॉलिरसच्या अहवालातून गृहनिर्मितीचं बजेटं समोर आलं आहे. त्यामध्ये वापरण्यात येणार सामानाचं प्रमाण 67 टक्के आणि कामगार खर्च 28 टक्के इतका असतो. आणि त्यामध्ये चालू इंधनाचा हिस्सा 5 टक्के नोंदविला जातो. त्यामुळे सध्या तिन्ही घटकांचे भाव वाढले आहेत. गेल्या वर्षी निवासी अपार्टमेंटचा निर्मिती खर्च प्रति स्क्वेअर फूट 2060 रुपये होता. चालू घडीला खर्च 2300 रुपयांवर पोहोचला आहे.

इतर बातम्या –

Kalyan Crime : लोकल ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या चोरटीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भरती ! शैक्षणिक पात्रता, शेवटची तारीख, एका क्लिकवर

Sharad Pawar: पवारांच्या घराबाहेर तासभर राडा; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.