ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्यास अशी नोंदवा तक्रार, लवकरच होईल निवारण

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन(National Consumer Helpline)द्वारे आपण याबद्दल तक्रार करू शकता. (Report fraud in online shopping, it will be resolved soon)

ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाल्यास अशी नोंदवा तक्रार, लवकरच होईल निवारण
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 8:41 PM

नवी दिल्ली : आजकाल लोक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर जास्त खरेदी करतात. येथे स्वस्त वस्तू आणि अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत आणि रिटर्नचा पर्याय देखील उपलब्ध आहे. परंतु, बर्‍याचदा असे घडते की आपण शॉपिंग वेबसाइटच्या सेवेवर खूश नसतो किंवा आपल्यासोबत फसवणूक होते. जसे आपण ऑर्डर केलेला माल आपल्याला मिळत नाही किंवा त्या सामानामध्ये काही समस्या असल्यानंतरही कंपनी ते रिटर्न घेत नाही. (Report fraud in online shopping, it will be resolved soon)

आपल्यासोबतही असे घडले आणि कंपनी आपले म्हणणे ऐकत नसेल तर आपण त्याबद्दल तक्रार करू शकता. यासाठी सरकारची एक नॅशनल कंझ्युमर हेल्पलाइन(National Consumer Helpline) आहे, जिथे आपण अशा गोष्टींबद्दल तक्रार करू शकता. अशा परिस्थितीत, आम्ही आपल्याला सांगत आहोत की आपण त्याबद्दल तक्रार कशी करावी, जेणेकरून आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत कंपनीवर कारवाई होईल आणि आपल्या तक्रारीचे निवारण केले जाईल.

कशी करायची तक्रार?

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन(National Consumer Helpline)द्वारे आपण याबद्दल तक्रार करू शकता. येथे तक्रार केल्यावर प्रकरण निकाली निघाल्याची आणि आपली आवडती वस्तू किंवा त्यांचे पैसे परत मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्यालाही तक्रार करायची असल्यास आपण त्याबद्दल अनेक प्रकारे तक्रार करू शकता. आपण राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या नोंदणी क्रमांकावर 1800-11-4000 किंवा 14404 वर तक्रार करू शकता. येथे आपणास हॉलिडे वगळता सकाळी 9.30 ते सकाळी 5.30 या वेळेत फोन करावा लागतो. याव्यतिरिक्त आपण 8130009809 या क्रमांकावर मॅसेज करु शकता. यासोबतच ऑनलाईन वेबसाईट https://consumerhelpline.gov.in/user/signup.php, NCH APP, Consumer App, UMANG APP च्या माध्यमातूनही तक्रार करु शकता.

काय आहे तक्रार प्रक्रिया?

तक्रार करण्याची प्रक्रिया अशी आहे की आपल्याला एका उल्लेखित प्लॅटफॉर्मवर लॉग इन करावे लागेल. आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर आपला आयडी तयार करावा लागेल. त्यावर आयडी तयार केल्यानंतर तुम्हाला तक्रारीसाठी एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये आपल्या खरेदीशी संबंधित प्रत्येक माहिती या फॉर्ममध्ये लिहावी लागेल, त्यानंतर लवकरच आपल्या तक्रारीवर कारवाई केली जाईल.

फेक वेबसाईट्सपासून सावध रहा

आपण नवीन वेबसाईटवरून खरेदी करत असल्यास आणि आपल्याला डिल आवडली असल्यास आपण वेबसाइट देखील तपासली पाहिजे. यासाठी आपल्याकडे अशा बर्‍याच वेबसाइट्स आहेत जिथून आपण वेबसाईटचे रँकिंग आणि पुनरावलोकन पाहू शकता. यासह आपल्याला वेबसाईटच्या विश्वासार्हतेबद्दल देखील माहिती मिळेल. (Report fraud in online shopping, it will be resolved soon)

इतर बातम्या

मौजमजा करण्यासाठी फिरायला आले, समुद्रात पोहताना खोल पाण्यात गेल्यामुळे दोघांचा मृत्यू

लॉकडाऊनमुळे गटई कामगारांवर उपासमार, रिपाइंचं ठाण्यात ‘शोले स्टाईल’ आंदोलन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.