Returns : जास्त रिटर्न हवे आहेत! मग करा ‘या’ फंडमध्ये गुंतवणूक अन् व्हा मालामाल?
तुम्ही जर बँकेत रक्कम दर महिन्याला जमा करत असाल किंवा एफडी काढली असेल तर तुम्हाला एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय आम्ही सांगणार आहोत. या माध्यमातून तुम्हाला चांगले रिटर्नसही मिळू शकतात. जाणून घ्या त्या खास गुंतवणुकीविषयी...
मुंबई : आजकाल पैसा येतो पण तो गुंतवायचा कुठे, हा प्रश्न अनेकांसमोर असतो. भविष्यासाठी पैसा बचत (saving) करणं देखील महत्वाचं आहे. ते तुम्हाला जमल्यास तुम्ही योग्य त्या ठिकाणी बचत करु शकतातय. कारण, चांगल्या गुंतवणुकीसाठी (investment) योग्य माहिती असणं गरजेचं आहे. धकाधकीच्या जीवनात इतका कुणालाही वेळ नसतो. पैसे आली की अनेकदा लगेच खर्चही होतात. यासाठीच आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय सांगणार आहोत. आजकाल जर तुम्ही शेअर बाजारात (shares market) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल. पण, तुम्हाला त्याबद्दल मर्यादित माहिती असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. याशिवाय, जर तुम्हाला त्यात कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करायची असेल, तर ब्लूचिप फंड श्रेणी तुमच्यासाठी योग्य असेल. येथे तुम्हाला कमी जोखमीसह चांगले उत्पन्न मिळू शकते. आम्ही तुम्हाला ब्लूचिप फंडांबद्दल सांगत आहोत जेणेकरून तुम्हीही त्यात गुंतवणूक करून नफा मिळवू शकता.
ब्लूचिप फंड्स म्हणजे काय?
हे फक्त लार्ज-कॅप म्युच्युअल फंड आहेत. जरी काही लार्ज-कॅप म्युच्युअल फंडांच्या नावांमध्ये ब्लूचिप जोडल्या गेल्या आहेत. जसे अॅक्सिस ब्लूचिप फंड, आयसीआयसीआय प्रू ब्लूचिप फंड, एसबीआय ब्लूचिप फंड, कोटक ब्लूचिप फंड किंवा फ्रँकलिन ब्लूचिप फंड. याशिवाय, लार्ज आणि मिड कॅप विभागातील मिरे अॅसेट इमर्जिंग ब्लूचिप फंड, प्रिन्सिपल इमर्जिंग ब्लूचिप फंड आहे.
जोखीम घेऊन चांगला परतावा
ब्लूचिप कंपन्या अशा कंपन्यांना म्हणतात ज्यांचा आकार खूप मोठा आहे आणि ज्यांची आर्थिक स्थिती मजबूत आहे. असे मानले जाते की त्यांच्या समभागांमध्ये अस्थिरता कमी आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये गुंतवणूक केल्यावर नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. विशेषत: दीर्घकालीन लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांसाठी मोठ्या100 कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांकडून किमान 80 टक्के निधीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
कोणी गुंतवणूक करावी?
कमी जोखीम घेऊन शेअर बाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ब्लूचिप फंडांची शिफारस केली जाते. किमान 5 वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन या योजनांमध्ये गुंतवणूक करावी. यामध्ये लॉक-इन कालावधी नसतो. त्यामुळे तुम्ही आवश्यकतेनुसार पैसे काढू शकता. परंतु लक्षात ठेवा की अल्पावधीत शेअर बाजारातील चढउतारांचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर अधिक होऊ शकतो तर दीर्घकाळात हा धोका कमी होतो. योग्य म्युच्युअल फंडात पैसे एकत्र गुंतवण्याऐवजी एसआयपीद्वारे गुंतवणूक केली जाईल. एखाद्याने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी. SIP च्या माध्यमातून तुम्ही त्यात दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता. यामुळे जोखीम आणखी कमी होते कारण त्याचा बाजारातील अस्थिरतेचा फारसा परिणाम होत नाही.
इतर बातम्या
Sanjay Raut : काश्मीर फाईलवाल्यांनी आता “भाग सोमय्या भाग” हा सिनेमा काढावा, राऊतांचा खोचक टोला