RIL AGM 2021: रिलायन्स जिओ देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार?
देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बिरुद मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ( Reliance Industries Limited- RIL) 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (RIL AGM 2021) गुरुवारी पार पडणार आहे.
मुंबई: देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे बिरुद मिरवणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ( Reliance Industries Limited- RIL) 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (RIL AGM 2021) गुरुवारी पार पडणार आहे. यावेळी RIL उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी काही महत्वपूर्ण घोषणा करु शकतात. यापैकी सर्वात जास्त उत्सुकता ही रिलायन्स जिओच्या सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोनबद्दल आहे. रिलायन्सकडून AGM च्या व्यासपीठावरून हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. याशिवाय, जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अराम्कोशी व्यवहारासंदर्भातही या बैठकीत घोषणा होऊ शकते. (RIL AGM 2021 Indias cheapest 5g smartphone can be lauched by reliance today)
Reliance Jio आणि Google कडून स्वस्त 5G स्मार्टफोनची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यामुळे आज हा फोन लाँच झाल्यास तो देशातील सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन ठरेल. सध्याच्या घडीला पोको M3 प्रो 5जी हा भारतामधील सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. त्याची किंमत 13999 रुपये इतकी आहे.
रिलायन्स जिओच्या नव्या 5G स्मार्टफोनची किंमत?
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओच्या नव्या 5G स्मार्टफोनची किंमत साधारण 4000 रुपये इतकी असू शकते. आगामी दोन वर्षात Reliance Jio कडून 150 ते 200 कोटी स्मार्टफोन विकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. या स्मार्टफोनवरुन रिलायन्स जिओचे प्रीपेड आणि पोस्टपेड नेटवर्क प्लॅन वापरता येतील.
Reliance JIO कडून मुंबई आणि पुण्यात 5G नेटवर्कच्या टेस्टिंगला सुरुवात
रिलायन्स जिओने देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. यासाठी रिलायन्स जिओने जगातील बड्या कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत रिलायन्स जिओ स्वत:च्या बळावर 5G चाचण्या करत आहे. तर पुण्यात रिलायन्सकडून नोकिया कंपनीची मदत घेतली जात आहे. तर दिल्ली आणि गुजरातमध्ये जिओकडून अनुक्रमे एरिक्सन आणि सॅमसंगच्या मदतीने संयुक्तपणे 5G नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत.
हैदराबादमध्येही रिलायन्स 5G चाचणीसाठी तयारी करत आहे. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. देशात 5G नेटवर्क व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यापूर्वी या चाचण्या रिलायन्स जिओसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने अजूनही 5G नेटवर्कसाठी लागणारा परवाना आणि लहरींचा (स्पेक्ट्रम) लिलाव केलेला नाही.
सध्या Reliance JIO कडून mmWave आणि मिड-बैंड स्पेक्ट्रमच्या माध्यमातून नेटवर्क आणि उपकरणांची चाचणी केली जात आहे. जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने 5G तंत्रज्ञान आणि प्राथमिक रचना तयार केली आहे. यामध्ये रेडिओ टेक्नॉलॉजी, मॅक्रो बेस स्टेशन, इनडोर सेल आणि कोर सॉफ्टवेअर नेटवर्कचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
Reliance Jio Phone Offer : केवळ 1999 रुपयात जिओ फोन, 2 वर्ष अनलिमिटेड कॉलिंग
Reliance Jio | रिलायन्स जिओचे तीन सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, जाणून घ्या डिटेल माहिती
Reliance Jio GigaFiber : किंमत, पॅकेज आणि सर्व काही…
(RIL AGM 2021 Indias cheapest 5g smartphone can be lauched by reliance today)