New Rules | कारमधील मागील प्रवाशांना ही कम्पलसरी सीट बेल्ट.. नाहीतर होईल असा त्रास की..
New Rules | कारमध्ये बसणाऱ्या मागील प्रवाशांना ही आता सीट बेल्ट अनिवार्य होणार आहे. सीट बेल्ट न वापरल्यास तुमची डोकेदुखी वाढणार आहे..
नवी दिल्ली : आता कारमधील मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट (Seatbelt) बांधणे अनिवार्य करण्यात येणार आहे. केंद्र सरकार (Central Government) लवकरच त्यासाठी कायद्यात बदल करणार आहे. जर तुम्ही या नियमाचे (Rules) पालन केले नाही तर तुमच्या डोक्याला ताप होणार आहे. ..
मागील सीटवरील प्रवाशांना नवीन नियमानुसार बेल्ट लावणे आवश्यक आहे. त्यांनी या नियमांचे पालन न केल्यास गाडीत अलार्म वाजेल. जोपर्यंत प्रवाशी सीटबेल्ट बांधत नाहीत, तोपर्यंत हा अलार्म वाजत राहिल.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने याविषयीचा मसूदा तयार केला आहे. हा मसूदा लवकरच मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठव्यात येईल. या नियमांना मंजूरी मिळताच पुढील सीटवर बसलेल्या व्यक्तीप्रमाणेच मागील सीटवरील प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे अनिवार्य करण्यात येईल.
या संबंधीच्या प्रस्तावावर जनतेकडून हरकती मागवण्यात आल्या आहेत. सुरक्षासंबंधी उपाय योजना करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. या प्रस्तावावर जनतेकडून 5 ऑक्टोबरपर्यंत जनतेच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत.
सीटबेल्टचा वापर हा पूर्वीपासूनच अनिवार्य होता. पण यासंदर्भात कुठलाही कायदेशीर कारवाई करण्यात येत नव्हती. पण आता मागील सीटवरील व्यक्तींसाठीही कायदा कडक करण्यात येणार आहे.
टाटा सन्सचे (Tata Sons) माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांनी सीटबेल्ट बांधला नव्हता. रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू ओढावला. त्यानंतर सरकार आता सीटबेल्ट अनिवार्य करण्याविषयी गंभीरतेने विचार करत आहे.
कारमधील सर्व प्रवाशांसाठी सीटबेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या प्रवाशांवर दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. पण मागील सीटवरील प्रवाशी अद्यापही सीटबेल्ट वापरण्याबाबत जागरुक नाहीत.