Rolls Royce car | रॉल्स रॉयसच्या ‘या’ महागड्या कार; 2021 बोट टेलची किंमत 28 मिलियन डॉलर

रॉल्स रॉयसच्या गाड्या अतिशय महागड्या आहेत. त्यांचा लक्झरीयस कार्सच्या यादीत समावेश होतो. सर्वसामान्यांना त्या घेणे तर दुरच. परंतु त्यांना रस्त्यावर पाहणेदेखील कठीण असते. रॉल्स रॉयसच्या चार महागड्या कारची माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

Rolls Royce car | रॉल्स रॉयसच्या ‘या’ महागड्या कार; 2021 बोट टेलची किंमत 28 मिलियन डॉलर
रॉल्स रॉयसच्या गाड्या अतिशय महागड्या Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 12:07 PM

कारप्रेमींमध्ये रॉल्स रॉयसच्या कारबद्दल (Rolls Royce car) खूप आकर्षण असते. रॉल्स रॉयस कार निर्माता कंपनी आपल्या महागड्या व आकर्षक लूकसाठी जगभरात प्रसिध्द आहे. सिल्वर घोस्‍ट, व्रेथ आणि सिल्वर शॅडो हे काही प्रीमिअम मॉडेल्सपैकी एक आहेत. रॉल्स रॉयसच्या कार सर्वाधिक महागड्या असण्याचे मोठे कारण म्हणजे बिस्पोक डिपार्टमेंट आहे, जे लक्झरी कारप्रेमींना ‘कस्टमाइजेशन’(Customization) ची सुविधा देते. या सुविधेचा लाभ घेऊन कार मालकांना त्यांना पाहिजे असलेल्या सर्व सुविधा कारमध्ये उपलब्ध होण्यास मदत होत असते. लिमोजिन आणि कूपच्या व्यतिरिक्त फेटम, घोस्ट, व्रेथ आणि कुलिनन आदी यांची करंट रेंज आहेत. या लेखातून रॉल्स रॉयसच्या अजून महागड्या (expensive) गाड्यांची माहिती घेणार आहोत.

2021 बोट टेल

हे रॉल्स रॉयसचे सर्वात महागडे मॉडेल आहे. ही कार एका स्पेशल ग्राहकासाठी तयार करण्यात आली होती. रिपोर्टनुसार, या मॉडेलच्या केवळ तीनच कार बनलेल्या आहेत. बोट टेल रॉल्स रॉयसचे कोचबिलड डिपार्टमेंटचे रिवाइव्ड मॉडेल आहे. या कारची खरी ओळख म्हणजे तिची लक्झरी डिझाईन आहे. यात दोन लांब टेल आहेत, ज्यात, एक पिकनिक सेटअपचाही सहभाग आहे. यात 6.7 लीटरचा ट्‍वीन टर्बो व्ही12 इंजीन आहे. यात इटालियन फर्निचर ब्रांड प्रोमेमोरियाचे लेदर स्टूल लावण्यात आले आहे. कारची किंमत अंदाजे 28 मिलियन डॉलर आहेत.

2017 रॉल्स रॉयस स्वेपटेल

ही लक्झरी कार 2003 फेटम कूपवर आधारीत आहे. कंपनीला या गाडीला तयार करायला चार वर्षे लागलीत. या गाडीत लेदर आणि वूडचे पॅनल देण्यात आले आहे. गाडीच्या समोरील बाजूस टेडमार्क स्क्वायर ग्रील आहेत. याची अंदाजित किंमत 12.8 मिलियन डॉलर आहे.

1904 रोल्स रॉयस 10 एचपी

रॉल्स रॉयसची ही अजून एक एक्सक्लूसिव्ह कार आहे. ही फेटम किंवा घोस्टसारखी मॉडर्न मॉडलवर आधारीत नसली तरी या गाडीला मोठी मागणी आहे. यात 2.0 लीटरचे दोन सिलेंडर इंजीन 10 एचपीच्या कारमधील एक वैशिष्ट्य आहे. याचा ट्राअँगुलर टोप रेडिएटर ट्रेडमार्क ब्रांडची एक वेगळी ओळख निर्माण करतो. याची किंमत अंदाजे 6.4 मिलियन डॉलर आहे.

1912 डबल पुलमॅन लिमोसीन

ही कार ड्रायव्हरांना लक्षात घेउन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे यातील समोरील सीटलाही मागील सीटांप्रमाणे आरामदायक बनविण्यात आले आहे. ही जगातील सर्वाधिक महागडया कार्सपैकी एक आहे. या कारला ‘द कोर्गी’ असे निकनेमदेखील देण्यात आले आहे. 2012 मध्ये गुडवुडमध्ये 6.4 मिलियन डॉलरमध्ये या कारची विक्री झाली होती.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.