Railway Reservation | 5 ते 12 वयातील मुलांसाठी रेल्वेचा बर्थ बुक करण्याचा नियम काय ? किती असते भाडे ?

मुलांसोबत रेल्वेचा प्रवास करताना तिकीट पूर्ण काढावे लागते की अर्धे याबाबत अजूनही पुरेसे ज्ञान सर्वसामान्यांना नसते पाहूया याबाबत नेमके नियम काय आहेत ?

Railway Reservation | 5 ते 12 वयातील मुलांसाठी रेल्वेचा बर्थ बुक करण्याचा नियम काय ? किती असते भाडे ?
INDIAN RAILWAYImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 3:34 PM

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : भारतीय रेल्वेने मुलांसाठी तिकीटांच्या दराचा नियमात बदल करुन गेल्या सात वर्षांत तब्बल 2800 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई केली आहे. एका आरटीआय कार्यकर्त्याने केलेल्या माहितीच्या अर्जाला रेल्वेची आयटी कंपनी ‘क्रिस’कडून दिलेल्या उत्तरातून ही बाब उघडकीस आली आहे. लहान मुलांच्या प्रवास भाड्याच्या सुधारित नियमांमुळे एकट्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 560 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे हे वर्षे सर्वाधिक नफ्याचे वर्ष ठरले आहे. रेल्वेची ‘क्रिस’ कंपनी प्रवासी आणि मालवाहतूक, रेल्वे दळणवळण नियंत्रण सारख्या मुख्य सेवांमध्ये माहिती तंत्रज्ञान विषयक तंत्रज्ञान पुरविते.

रेल्वे पाच ते बारा वयोगटातील मुलांचे संपूर्ण तिकीट भाडे वसुल करणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने 31 मार्च 2016 रोजी केली होती. जर या वयोगटातील मुलांना स्वतंत्र बर्थ सीट हवी आहे तर त्यांना संपूर्ण भाडे द्यावे लागणार आहे. हा सुधारित नियम 21 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आला होता. याआधी रेल्वे 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी अर्धे भाडे आकारुन त्यांनी बर्थ उपलब्ध करीत होता. जर मुलांनी स्वतंत्र बर्थ न घेता आपल्या सहकारी वयस्काच्या बर्थवरच प्रवास करायचा असेल तर त्यांच्यासाठी अर्धे तिकीट आकारले जात होते.

मुलांसाठी काय आहे नियम

रेल्वे प्रवासात 1 ते 4 वयोगटातील मुलांसाठी रिझर्व्ह बोगीतून रिझर्व्हेशन करीत प्रवास करण्याची काही गरज नाही. पाच वर्षांखालील मुले विनातिकीट ट्रेनचा प्रवास करु शकतात. तर 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी मात्र स्वतंत्र आरक्षित सीट नको असेल तर अर्धे भाडे भरुन आपल्या आई-वडीलांसोबत किंवा नातेवाईकांच्या सीटवरुन प्रवास करु शकतात. परंतू 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी जर स्वतंत्र बर्थ हवी असेल तर त्यांना संपूर्ण भाडे भरावे लागेल. जर प्रवास करताना तुम्ही 1 ते 4 वयोगटातील मुलाचे डीटेल्स भरले तर त्याचे भाडे द्यावे लागेल. जर डीटेल्स नाही भरले तर 1 ते 4 वयातील मुले मोफत प्रवास करु शकतात.

आता मुलांसाठी पूर्ण बर्थ आरक्षित केली जाते

क्रिसने मुलांची दोन श्रेणीचे भाड्यांचा पर्यायाआधारे साल 2016-17 ते 2022-23 पर्यंतचे कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. या सात वर्षांत 3.6 कोटीहून अधिक मुलांनी रिझर्व्ह सीट वा बर्थचा पर्याय न निवडता अर्धे भाडे भरुन प्रवास केला. दुसरीकडे 10 कोटीहून अधिक मुलांनी स्वतंत्र बर्थ वा सीटचा पर्याय निवडून पूर्ण भाडे भरले. आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांच्या मते रेल्वेने प्रवास करणाऱ्या एकूण मुलांपैकी 70 टक्के मुलांनी पूर्ण भाडे भरुन बर्थ वा सीटचे आरक्षण करणे पसंत केले आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.