बचत खात्याचे ‘हे’ नियम पाळा, अन्यथा इन्कम टॅक्सची नोटीस येईल
तुमच्याकडे बचत खाते आहे का? असे असेल तरी ही बातमी नक्की वाचा. तुम्ही तुमच्या बचत खात्यात किती पैसे जमा करू शकता किंवा एका वेळी किती पैसे काढू शकता याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवे. आज आम्ही तुम्हाला बचत खात्याशी संबंधित अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया.
तुम्ही बचत खाते वापरत असाल तर काही नियमांची तुम्हाला माहिती असायला हवी? अन्यथा तुम्हाला आयकराच्या नोटीसला समोरे जावे लागू शकते. आता हे नियम नेमके कोणते आहेत, बचत खाते असणाऱ्यांनी कोणते नियम पाळायला हवे, याविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊया. बहुतांश लोकांची बँकेत बचत खाती उघडलेली असतात. लोक या खात्यात आपली बचत ठेवतात आणि त्यांना हवं तेव्हा ही बचत सहजपणे काढू शकतात, पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही तुमच्या बचत खात्यात किती पैसे जमा करू शकता किंवा एका वेळी किती पैसे काढू शकता. आज आम्ही तुम्हाला बचत खात्याशी संबंधित अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. बचत खात्याबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक असलेल्या काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. खाली या गोष्टी तुम्ही समजून घ्या. यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही.
किती रुपये काढता येतात?
इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार, 1 आर्थिक वर्षात तुम्ही तुमच्या बचत खात्यात फक्त 10 लाख रुपये जमा करू शकता. तसेच 1 आर्थिक वर्षात केवळ 10 लाख रुपये काढता येतात. कलम 269 एसटीनुसार, एखादी व्यक्ती एका दिवसात आपल्या बचत खात्यातून केवळ 2 लाख रुपयांचा एकच व्यवहार करू शकते.
अशा परिस्थितीत इन्कम टॅक्स नोटीस
- एखाद्या व्यक्तीने 1 एप्रिल ते 3 मार्चदरम्यान आपल्या बचत खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल तर तो उच्च मूल्याचा व्यवहार मानला जाईल. अशा परिस्थितीत बँक किंवा वित्तीय संस्थेला प्राप्तिकर कायदा 1962 च्या कलम 114 B अन्वये आयकर विभागाला कळवावे लागेल.
- तुम्ही एका दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करत असाल तर तुम्हाला पॅन नंबर द्यावा लागेल. पॅन क्रमांक उपलब्ध नसल्यास फॉर्म 60/61 सादर करणे आवश्यक आहे.
- तुम्ही एका आर्थिक वर्षात 10 लाखरुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळेल, ज्याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल. नोटिशीला उत्तर देण्यासाठी, आपल्याकडे निधीच्या स्त्रोताबद्दल आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी पुरेसे पुरावे असणे आवश्यक आहे.
- हे बँक स्टेटमेंट, गुंतवणुकीच्या नोंदी आणि वारसा दस्तऐवज असू शकतात. अशावेळी तुम्ही टॅक्स अॅडव्हायजरचा सल्ला घेऊ शकता.
- त्यामुळे कोणतेही व्यवहार करताना आधी नियम जाणून घ्यायला हवे, नाहीतर आपल्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)