Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरी सोडताना बँकेतील ही कामं करा, अन्यथा आर्थिक भुर्दंड सहन करायला तयार राहा

Salary Bank account | सॅलरी अकाऊंटवर संबंधित खातेधारकाला अनेक फायदे मिळतात. मात्र, तुमच्या सॅलरी अकाऊंटमध्ये पैसे येण्याचे बंद झाले तर ते आपोआप बचत खात्यामध्ये (Saving Account) रुपांतरित होते. अनेक बँका तीन महिने पगार न आल्यास संबंधित खाते सेव्हिंगमध्ये कन्व्हर्ट करतात.

नोकरी सोडताना बँकेतील ही कामं करा, अन्यथा आर्थिक भुर्दंड सहन करायला तयार राहा
सॅलरी अकाऊंट
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 11:23 AM

मुंबई: नोकरदार व्यक्ती कोणत्याही कंपनी किंवा संस्थेत कामाला लागतात तेव्हा कंपनीकडून बँकेत त्यांचे खाते उघडले जाते. या सॅलरी अकाऊंटमध्ये (Salary Account) दर महिन्याला तुमचा पगार जमा होतो. त्यामुळे या खात्यासाठी झिरो बॅलन्सची सुविधा असते. त्यानंतर तुम्ही नव्या कंपनीत नोकरीला (New Job) गेल्यास त्याठिकाणी नवे बँक खाते उघडले जाते. अनेकदा आपण जुनं खातं बंद करायला विसरतो. ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे एखादी नोकरी सोडताना तुम्ही काही गोष्टी जरूर ध्यानात ठेवल्या पाहिजेत. (Salary account rules what happen when you leave one job and salary is not credited regularly)

सॅलरी अकाऊंट सेव्हिंगमध्ये कन्व्हर्ट

सॅलरी अकाऊंटवर संबंधित खातेधारकाला अनेक फायदे मिळतात. मात्र, तुमच्या सॅलरी अकाऊंटमध्ये पैसे येण्याचे बंद झाले तर ते आपोआप बचत खात्यामध्ये (Saving Account) रुपांतरित होते. अनेक बँका तीन महिने पगार न आल्यास संबंधित खाते सेव्हिंगमध्ये कन्व्हर्ट करतात.

सेव्हिंग अकाऊंटचे नियम लागू

तुमचे सॅलरी अकाऊंट सेव्हिंगमध्ये कन्व्हर्ट झाल्यावर नियमात बदल होतो. तुमच्या खात्यात पगार येत नसेल आणि दोन वर्ष कोणताही व्यवहार झाला नसेल तर संबंधित सॅलरी अकाऊंट इनऑपरेटिव होते. तसेच बचत खात्यासाठी तुम्हाला मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागतो. तसेच डेबिट कार्ड, एसएमएस अलर्ट आणि चेकबुकसाठी अतिरिक्त शुल्क अदा करावे लागते.

जुन्या कंपनीतील बँक खाते बंद न केल्यास काय होते?

तुम्ही नवीन ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर जुन्या कंपनीतील बँक खाते बंद न केल्यास संबंधित बँक खाते फ्रीज केले जाते. हे खाते पुन्हा सुरु करायचे झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो. त्यामुळे तुम्ही नवीन कंपनीत गेल्यास जुने सॅलरी अकाऊंट बंद करावे. अन्यथा त्याचा बचत खात्यासारखा वापर करावा.

संबंधित बातम्या:

कंपनी बदलताय?, आता ‘हे’ काम करणं आणखी सोप्पं, जाणून पूर्ण प्रक्रिया

नोकरी सोडताना ‘हा’ फॉर्म भराच, अन्यथा तुमचे पैसे मिळवताना नाकीनऊ येईल

आता घरबसल्या PF अकाऊंट ऑनलाईन करा ट्रान्सफर, EPFO ने सांगितली संपूर्ण प्रोसेस

(Salary account rules what happen when you leave one job and salary is not credited regularly)

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.