HRA Claim : कर वाचविण्यासाठी आई-वडिलांसोबतच भाडे करारनामा शक्य? पण नियम काय सांगतात, चला तर जाणून घेऊ

कर वाचविण्यासाठी आई-वडिलांसोबतच भाडे करार करता येईल का, असा पचनी न पडणारा प्रश्न पडला असेल अथवा नसेल तर त्याचे समाधानकारक उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. नियम काय सांगतो आणि त्याचा फायदा तुम्हाला होतो का, हे पाहू..

HRA Claim : कर वाचविण्यासाठी आई-वडिलांसोबतच भाडे करारनामा शक्य? पण नियम काय सांगतात, चला तर जाणून घेऊ
HRA Claim
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 9:13 AM

मुंबई : घरभाडे भत्ता (House Rent Allowance) हा कर बचतीचा सर्वात सोपा मार्ग आहे. नियमीत वेतन प्राप्त करणा-या पगारदार व्यक्तीला घरभाडे भत्ता मिळतो. जे कर्मचारी किरायाच्या अथवा भाड्याच्या घरात (Rent House) राहतात, त्यांना एचआरए च्या मदतीने कर सवलतीचा फायदा मिळतो. ते वेतनात एचआरए च्या नावावर वजावटीचा दावा दाखल करु शकतात. वास्तविक अनेक नशीबवान कर्मचारी त्यांच्या वडिलांच्या अथवा वडिलोपार्जित जागेतच राहतात. आई-वडिलांच्या घरात राहत असताना घरभाड्याचा दावा करता येतो का नाही, याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतो. कर वाचविण्यासाठी आई-वडिलांसोबतच भाडे करार (Rent Agreement) करता येईल का, असा पचनी न पडणारा प्रश्न पडला असेल अथवा नसेल तर त्याचे समाधानकारक उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे. नियम काय सांगतो आणि त्याचा फायदा तुम्हाला होतो का, हे पाहू..

…तर भाडे द्यावे लागेल

या कर सवलतीचा फायदा घेण्यासाठी कायदेशीररित्या तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना भाडे अदा करावे लागेल. त्यासाठी आई-वडिलांच्या बँक खात्यात किरायाची रक्कम जमा करावी लागेल. ही रक्कम तुम्ही धनादेशाद्वारे अदा करु शकता. या आधारावर तुम्ही एचआरए वजावटीचा दावा करु शकता. भाडे हे कायम घरमालकाकडेच जमा करायचे असते. त्यामुळे घर आई-वडिलांच्या नावे असायला हवे. अथवा आईच्या आणि बाबा यांच्यापैकी एकाच्या नावावर घर असायला हवे. जर दोघांची संयुक्त मालकी असेल तर एकाच्या खात्यात भाड्याची रक्कम हस्तांतरीत करावी लागेल. एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की, कायदेशीर मालक असलेल्या आई अथवा वडिलांच्याच खात्यात ही रक्कम अदा करायची आहे. पण घर तुमच्याच नावे असेल तर तुम्ही एचआरएसाठी दावा दाखल करु शकणार नाहीत.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे

एचआरए दाव्यासाठी तुमच्याकडे भाडेकरारनामा अथवा भाडे अदा केल्याची पावती असणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात, ती कंपनी तुमच्याकडे हा भाडे करारनामा जरुर मागेल. कंपनी तुम्हाला भाडे अदा केल्याची पावती ही मागू शकते. आई-वडिलांसोबत तुम्हाला भाडे करारनामा करणे सर्वात सोपे आहे. या करारनाम्यावर आई-वडिल अथवा दोघांपैकी एकाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. त्यावर स्टॅम्प ही चिकटविणे आवश्यक आहे.

नियम काय सांगतो

प्राप्तीकर खाते कायदा नियम 10(13) नुसार, कोणत्याही पगारदार व्यक्तीला एचआरएआधारे कर सवलतीसाठी दावा दाखल करता येतो. पगारदार व्यक्ती भाडेविषयक कर वजावटीचा दावा दाखल करु शकतो. त्याला मूळ वेतनातून 10 टक्के रक्कम वगळता सूटीचा फायदा मिळतो.

एचआरए सूट मर्यादा

  1. पगारदार व्यक्तीला प्राप्तीकर नियम 1962 च्या नियम 2 ए नुसार सूट मर्यादा विषद करण्यात आली आहे.
  2. तुम्हाला मिळणारी वास्तविक एचआरए रक्कम
  3. मेट्रो शहरासाठी मूळ पगाराच्या 50 टक्के महागाई भत्ता, निम शहरी भागासाठी 40 टक्के डीए
  4. मूळ वेतनाच्या 10 टक्के वगळता मिळणारा डीए

इतर बातम्या

Jalgaon Attack | मित्राच्या वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग, तरुणावर दोघांचा हल्ला

Chandrapur : मारहाण करणं पडलं महागात, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाची मारहाण, गुन्हा दाखल

Holi | आपुलकीचा कोकणातलो शिमगो ! अवसरांवर दगड मारण्याची प्रथा, देवी भावईच्या साक्षीने हुडोत्सव साजरा