Saving Tips: पगार मिळाल्यावर या फॉर्म्युल्याने बनवा घराचे बजेट, दर महिन्याला होईल बचत

हा फॉर्म्युला तुमच्या घरगुती बजेटशी संबंधित आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा पगार अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित म्हणजेच मॅनेज करू शकाल.

Saving Tips: पगार मिळाल्यावर या फॉर्म्युल्याने बनवा घराचे बजेट, दर महिन्याला होईल बचत
बचतImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 2:26 PM

मुंबई,  पगारदार वर्गातील लोकांकडून तुम्ही अनेकदा एकले असेल की,  त्यांच्यासाठी महिन्याचा शेवट हा 15 तारखेनंतर सुरू होतो. म्हणजे 15 तारखेनंतर त्याचा पगार जवळपास संपतो. मग उरलेल्या 15 दिवसांचा खर्च कसा तरी ते सांभाळतात. तुमच्यासोबतही असं झालं असेल तर आम्ही तुम्हाला एक फॉर्म्युला (Formula For Saving) सांगणार आहो. हा फॉर्म्युला तुमच्या घरगुती बजेटशी संबंधित आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा पगार अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित म्हणजेच मॅनेज करू शकाल. 50-30-20 या सूत्राच्या मदतीने तुम्ही तुमचे घरगुती बजेट बनवू शकता.

जाणून घेऊया काय आहे हा फाॅर्म्युला

  1. पगाराच्या 50 टक्के वापर: पगारदार वर्गातील लोकांचा पगार सहसा महिन्याच्या 30 किंवा 31 तारखेला आणि दुसर्‍या तारखेला त्यांच्या खात्यात जमा होतो. म्हणूनच पगार आल्यानंतर त्यातील 50 टक्के रक्कम मूलभूत खर्चासाठी बाजूला ठेवावी. जसे घर भाडे, कार ईएमआय आणि घरगुती शिधा इ. हे असे खर्च आहेत जे वजा करता येत नाहीत. म्हणूनच पगाराच्या आगमनाने, तुम्ही अशा खर्चासाठी पैसे बाजूला ठेवावे.
  2. आवडीच्या गोष्टींवर 30 टक्के खर्च करू शकतो: तुम्ही तुमच्या पगाराच्या 30% तुमच्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करू शकता. जसे की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चित्रपट पाहायला जाऊ शकता. रात्रीच्या जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. परंतु हे 30 टक्के खर्च करणे हे सर्वात आव्हानात्मक काम आहे हे लक्षात ठेवा. समजा तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे आणि तुम्हाला सुट्टीत बाहेर फिरायला जायचे आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमचा खर्च व्यवस्थापित करावा लागेल आणि यापैकी सर्वात महत्वाची कामे पूर्ण करावी लागतील. समजा तुम्ही एका महिन्यात एक फोन घेतला आणि नंतर पुढच्या महिन्यात बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला.
  3. हे सुद्धा वाचा
  4. 20% सर्वात महत्वाचे आहे: शेवटी, तुम्हाला तुमच्या पगाराच्या 20% चांगल्या पद्धतीने गुंतवावे लागतील. हा पगाराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, ज्याकडे अनेकजण सहसा दुर्लक्ष करतात, मात्र तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे सर्वात महत्त्वाचे आहे. एकदा तुम्ही चित्रपट पाहण्याचा खर्च वजा करू शकता. पण बचतीशी कधीही तडजोड करू नका. तुम्ही अनेक ठिकाणी गुंतवणूक करू शकता. तुम्ही म्युच्युअल फंडात SIP देखील करू शकता. त्यामुळे आता जेव्हा जेव्हा पगार येईल तेव्हा 50, 30 आणि 20 चा फॉर्म्युला विसरू नका.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.