SBI Alert : YONO अॅपवरुन ट्रान्झॅक्शन करण्यापूर्वी लक्ष द्या, सध्या अडचणी येत असल्याचं बँकेकडून स्पष्ट
ज्या लोकांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, ते SBI च्या YONO अॅप्लिकेशनद्वारे ट्रान्झॅक्शन करु शकता. दरम्यान, काही दिवसांपासून बँकेच्या ग्राहकांना टेक्निकल अडचणींचा सामना करु शकतो. अशावेळी आता SBI ने अलर्ट जारी केला आहे.
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना बँकेसोबत ऑनलाईन माध्यमातूनही ट्रान्झॅक्शनची सुविधा देत आहे. यात ग्राहक आपल्या घरी बसून ट्रान्झॅक्शन करु शकतात आणि कुणालाही पैसे पाठवू शकतात. ज्या लोकांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, ते SBI च्या YONO अॅप्लिकेशनद्वारे ट्रान्झॅक्शन करु शकता. दरम्यान, काही दिवसांपासून बँकेच्या ग्राहकांना टेक्निकल अडचणींचा सामना करु शकतो. अशावेळी आता SBI ने अलर्ट जारी केला आहे. (SBI bank clarified that there are problems while transaction through YONO app)
SBI बँकेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे की, यूपीआय ट्रान्झॅक्शनबाबत टेक्निकल टीम काम करत आहे. सोबतच त्यांनी काही वेळासाठी दूसऱ्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन करण्यासाठी सांगितलं आहे. अशावेळी जाणून घेऊया की बँकेकडून काय अलर्ट जारी केला आहे आणि बँकेकडून ग्राहकांना काय सल्ला देण्यात आलाय.
SBIचा अलर्ट काय?
SBIच्या एका ग्राहकाने ट्विटरवरुन तक्रार केली आहे की, त्यांनी गूगल पे आणि सॅमसंग पे आदीमध्ये कार्ड लिंक करण्यात अडचणी येत आहेत. सोबतच त्यांनी SBIच्या YONO अॅपवरही अडचण येत आहे. यावर एसबीआयने उत्तर दिलं आहे की, याबाबत टेक्निकल टीम काम करत आहेत. SBI ने म्हटलं आहे की, कृपया लक्ष द्या, संबंधित टेक्निकल टीम यूपीआय देवाणघेवाण करण्यात येणाऱ्या समस्यांकडे पाहत आहे. त्यांचं समाधान करणं बाकी आहे. आम्ही तुम्हाला पर्यायी माध्यम वापरण्याची विनंती करत आहोत.
SBI अनेकदा टेक्निकल मेंटनन्स करते
बँकेकडून वेळोवेळी मेंटनन्सचं काम केलं जातं. टेक्निकल मेंटनन्समध्ये बँकेशी निगडीत सुविधा काही वेळापर्यंत बंद केल्या जातात. ज्यावेळी मेंटनन्सचं काम केलं जातं, त्यावेळी ग्राहकांना इंटरनेट किंवा ऑनलाईन बँकिंगशी निगडीत सुविधांचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. त्यावेळी एखादा ग्राहक काम त्याबाबत काम करत असेल तर ते होणार नाही. उलट पैशाची देवाण घेवाण अडकून पडू शकते.
SBIचं ग्राहकांना निवेदन
कोरोना संक्रमण पाहता स्टेट बँक आपल्या कामाच्या पद्धतीत सातत्याने बदल करत आहे. आता डिजिटल बँकिंगवर बँकेचा भर आहे. वेबसाईट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून बँकिंग व्यवहार वाढवण्याची तयारी सुरु आहे. स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांना सल्ला दिला आहे की, कॅश किंवा एटीएमच्या बदल्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर जास्त करावा. बँकेच्या वेबसाईटच्या माध्यमातून आरटीजीएस, एनईएफटी, यूपीआय आणि रुपे कार्डचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे.
Tips to Increase Weight : वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तर ‘या’ 6 पदार्थांचा आहारात समावेश करा!https://t.co/g1QkOZRxFO | #IncreaseWeight | #Food | #Healthcare | #Weight | #IncreaseWeighttips | #Diet | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 16, 2021
संबंधित बातम्या :
‘या’ नामी कंपनीच्या सर्व कर्मचार्यांनी एकत्र दिला राजीनामा, समस्या न सुटल्यास ही आयडिया वापरा
SBIकडून कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट जारी; 16 आणि 17 जुलैला बँकिंग सेवा काही तासांसाठी बंद
SBI bank clarified that there are problems while transaction through YONO app