Bank : एसबीआय ग्राहकांना आमिष पडेल महागात,रहा सावध, होऊ नका सावज..

Bank : SBI खातेदारांसाठी महत्वाची बातमी आहे..

Bank : एसबीआय ग्राहकांना आमिष पडेल महागात,रहा सावध, होऊ नका सावज..
रहा अलर्टImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 5:29 PM

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेतील (State Bank Of India) खातेदारांसाठी अलर्ट (Alert) आला आहे. त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. सावधानतेने व्यवहार करणे गरजेचे आहे. पत्र सूचना कार्यालयाने (PIB) याविषयीचा इशारा दिला आहे.

तुमच्या मोबाईलवर आलेले कॉल, मॅसेज, व्हॉट्सअप आणि मेलवर आलेल्या मॅसेजवर लागलीच विश्वास ठेऊ नका. त्यातील ऑफर्स, आमिषांना बळी पडू नका. नाहीतर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

हे सुद्धा वाचा

सायबर भामटे खात्याची गोपनिय माहिती चोरण्यासाठी हा फंडा वापरत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खातेदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काही सायबर भामटे भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांना लक्ष्य करुन आहेत. ग्राहकांना मोबाईलवर ते मॅसेज पाठवत आहेत. त्यांच्या खात्याशी जोडलेली गुप्त माहिती चोरण्यासाठी ते फंडा वापरत आहेत.

तुम्हाला खाते अपडेट करण्यासाठीची लिंक पाठविण्यात येईल. त्यासंबंधीचा फोन, एसएमएस अथवा ईमेल पाठविण्यात येईल. खाते अपडेट न केल्यास ते बंद पडण्याची भीती ग्राहकांना दाखविण्यात येत आहे. पण हा सर्व फसवणुकीचा प्रकार आहे.

त्यामुळे ग्राहकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तुमचे आधार कार्ड, पॅनकार्ड अथवा इतर कोणताही तपशील तुम्ही शेअर करु नका.

स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्याही ग्राहकाला त्याचा खाते क्रमांक, डेबिट, क्रेडिट कार्ड क्रमांक , मोबाईल क्रमांक अथवा इतर वैयक्तिक तपशील मागत नाही. PIB च्या फॅक्ट चेक टीमने याविषयीचा इशारा दिला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.