Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसबीआय की टपाल कार्यालय ; मुदत ठेवीवर कुठे मिळेल कमाईवर अधिकचा परतावा

कुठे मुदत ठेव योजनेत चांगला परतावा मिळेल, स्टेट बँकेत की टपाल कचेरीत या प्रश्नाचे उत्तर आपण शोधुयात. एसबीआय फिक्स्ड डिपॉझिटचा व्याजदर 2.90% ते 5.40% दरम्यान आहे. पोस्ट ऑफिसच्या ठेवीवर व्याजदर 5.50% ते 6.70% पर्यंत आहेत. 

एसबीआय की टपाल कार्यालय ; मुदत ठेवीवर कुठे मिळेल कमाईवर अधिकचा परतावा
एसबीआय कार लोनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 2:42 PM

मुदत ठेव (Fixed Deposit) योजनेत गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. सध्या ठेव योजनेवरील व्याजदर कमी झाले आहेत. त्यामुळे अधिक परतावा कोणत्या योजनेत मिळू शकेल हे पाहुयात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) की टपाल खात्याच्या (Post Office) मुदत ठेव योजनेत व्याजदर चांगला असेल आणि परतावा जास्त मिळेल याविषयी जाणून घेऊयात.तसे बघितले तर दोन्ही गुंतवणुकीचे उत्तम साधन आहेत, पण गुंतवणुकीवर (Investment) अधिक नफा कुठे मिळणार, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात घोळतो. दोन्ही सरकारीच्या अधिन व्यवसाय आहे. सरकारच्या साहाय्याने मुदत ठेवीवर व्याज दिले जाते. म्हणजेच तुमच्या ठेव सुरक्षित तर राहतेच पण तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची ही हमी मिळते. पण ज्यावेळी अधिक परतावा मिळण्याचे गणित जुळवायचे, त्यावेळी तुम्हाला दोघांमध्ये तुलना करावी लागेल.

एसबीआयची अथवा पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेची तुलना करण्यासाठी समान कालावधीची योजना पाहणे आवश्यक आहे. जर तुम्ही दोन्ही योजना एका वर्षासाठी घेतल्या आणि दोन्हीमध्ये समान पैसे जमा केले तर जास्त परतावा कुठे मिळतोय हे कळेल. व्याजदर आणि कालावधी यातील फरक पाहिला तर हा फरक 1.3 टक्के इतका आहे. एसबीआयच्या एफडीवर 5.4 टक्के आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीवर 6.7 टक्के दराने व्याज आहे. यानुसार कमाईतील तफावत 1.3 टक्के इतकी असेल. अर्थात व्याजदरावरुन टपाल खात्यातील ठेवीत जास्त परतावा मिळेल हे स्पष्ट होते.

एक लाखावर किती रुपयांचा नफा मिळेल

जर आपण एसबीआयच्या मुदत ठेवीत 1 लाख रुपये आणि पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिटमध्ये 5 वर्षांसाठी समान रक्कम जमा केली तर स्टेट बँक 64,362 रुपये व्याज म्हणून देईल. स्टेट बँकेची अंतिम रक्कम 1,64,362 रुपये असेल. तर 5 वर्षात पोस्ट ऑफिसच्या ठेवीत एकूण 2,00,016 रुपये मिळतील. तफावत तर स्पष्ट दिसत आहे. कुठे ग्राहकाने गुंतवणुक केल्यास त्याला जास्त फायदा होईल, अधिकचा परतावा मिळेल हे या आकड्यांवरुन स्पष्ट होते. टपाल खात्यातील मुदत ठेवीत तुमची रक्कम सरळसरळ दुप्पट होत आहे. त्याहून अधिकचा परतावा मिळत आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियात जवळपास 40 हजारांचा फटका बसत आहे. 40 हजार रक्कम सर्वसामान्यांसाठी फार मोठी आहे. म्हणजे गुंतवणुकीवर सर्वाधिक फायदा टपाल कचेरीत मिळतो यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ठेवीची मुदत ती किती

स्टेट बँकेच्या एफडीसाठी गुंतवणुकीचा कालावधी सात दिवस ते 10 वर्षांपर्यंत आहे, म्हणजे तुम्ही कमीत कमी सात दिवसांच्या अल्प कालावधीसाठी अथवा सर्वाधिक 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करु शकता. मात्र पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना एक वर्ष, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी आहे. नेट बँकिंग सुविधेचा वापर करून एसबीआयचे एफडी खाते सहजपणे ऑनलाइन उघडता येईल. मात्र, पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेव खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या शाखेत जावे लागते. एसबीआय मुदत ठेव योजनेचा व्याजदर 2.90% ते 5.40% दरम्यान आहे.

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेचे व्याजदर 5.50% ते 6.70% पर्यंत आहेत.पोस्ट ऑफिसकडून देण्यात येणाऱ्या एफडी योजनांची यूएसपी म्हणजे ही एक सरकारी योजना असून त्याचे व्याजदर दर तिमाहीला बदलले जातात. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवींच्या बाबतीत असा कोणताही नियम नाही. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमधून बँकांचे एफडी दर कमी होतात किंवा वाढतात. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवींच्या बाबतीत असा कोणताही नियम नाही. रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमधून बँकांचे एफडी दर कमी होतात किंवा वाढतात. एक हुशार गुंतवणुकदार तोच ठरतो. जो गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांचा विचार करून त्यानंतरच रक्कम गुंतवितो.

संबंधित बातम्या :  RD rates in Banks: कोणत्या बँकेत RDसाठी जादा व्याजदर? ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठे गुंतवणूक चांगली, जाणून घ्या

Milk Rates: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात दुधाचे दर तब्बल 10 रुपयांनी वाढले? महागाईनं जगणं बेहाल!

छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.