Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI ग्राहकांना गूड न्यूज : फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ, नवीन दर लागू

स्टेट बँकेच्या अन्य कालावधी साठीच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. स्टेट बँकेकडून 5-10 वर्ष कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वाधिक 5.40 टक्के दर दिला जातो. समान कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.20 टक्के व्याजदर प्रदान केला जातो.

SBI ग्राहकांना गूड न्यूज : फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ, नवीन दर लागू
debt relief Don't lend today by mistake or you will suffer bad consequences
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 7:07 PM

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (STATE BANK OF INDIA) ग्राहकांसाठी आकर्षक व्याज दराची घोषणा केली आहे. विशेष कालावधीसाठी स्टेट बँकेने फिक्स्ड डिपॉझिटवरील (FIXED DEPOSIT) व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने एक वर्षाहून अधिक आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने या कालावधीसाठी व्याजदर 5 टक्क्यांवरुन 5.1 टक्के केला आहे. बँकेने 0.1 टक्के वाढ केली आहे. सुधारित निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 5.50 टक्क्यांवरुन 5.60 टक्के होणार आहे. नवीन व्याजदराची शनिवार पासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. स्टेट बँकेचे नवीन दर दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी असणार आहे.

अन्य कालावधीच्या एफडीसाठी ‘जैसे थे’

स्टेट बँकेच्या अन्य कालावधी साठीच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. स्टेट बँकेकडून 5-10 वर्ष कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वाधिक 5.40 टक्के दर दिला जातो. समान कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 6.20 टक्के व्याजदर प्रदान केला जातो. दोन वर्षांपेक्षा अधिक आणि तीन वर्षाहून कमी एफडीवर 5.10 टक्के दराने व्याज दिले जाते. बँकेकडून तीन ते पाच वर्षासाठीच्या एफडीवर 5.30 टक्के दराने व्याज दिले जाते.

घरबसल्या करा FD प्रक्रिया (How to do FD in SBI Online)

1. स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि नेट बँकिंगवरुन वेबसाईटवर लॉग-इन करा.

2. होम पेजवरील ‘Deposit Schemes’(डिपॉझिट स्कीम्स) पर्यायावर जा आणि ‘Term Deposit’ (टर्म डिपॉझिट) वर क्लिक करा.

3. यानंतर तुम्ही ‘e-fixed deposit’(ई-फिक्स्ड डिपॉझिट) पर्यायावर क्लिक करा.

4. तुमचे एकाधिक अकाउंट असल्यास ड्रॉप-डाउन मेन्यूमधून तुम्ही ज्या अकाउंटवरुन एफडी करू इच्छिता ते अकाउंट सर्वप्रथम निवडा.

5. ‘FD PRINCIPAL VALUE’ (FD मुद्दल रक्कम) निवडा आणि ‘AMOUNT’ (रक्कम) रकान्यात रक्कम एन्टर करा.

6. समजा, तुमचे वय 60 वर्षाहून अधिक असल्यास ‘SENIOR CITIZENS’ (ज्येष्ठ नागरिक) टॅब वर क्लिक करा.

7. तुम्हाला स्क्रीनवर मॅच्युरिटी बाबतच्या सूचना दिसून येतील. तुम्ही त्यावर टिक करा.

8. सर्व प्रक्रियेच्या शेवटी ‘SUBMIT FD’ (FD सबमिट करा) वर क्लिक करा.

संबंधित बातम्या :

Government Schemes : पत्नीच्या नावे बँकेत खातं उघडत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर! दरमहा मिळेल 45000/- पेंशन!

महिन्याला पाच हजार रुपये जमा करा आणि मिळवा 15 लाख रुपये, जाणून घ्या सर्वकाही

महिलांना ‘या’ सरकारी योजनेतून रोजगार मिळणार, दरमहा 4 हजार कमावण्याची संधी, पटापट जाणून घ्या

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.