चेक पेमेंट रोखण्यासाठी आता बँकेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; SBI बँकेची खास सुविधा
SBI Cheque payment | एसबीआयच्या योनो अॅपवरुन तुम्ही चेक पेमेंट रोखण्यासाठी रिक्वेस्ट टाकू शकता. त्यासाठी अॅपमधील रिक्वेस्ट पर्यायावर क्लिक करुन चेक बुक आणि स्टॉप चेक हे पर्याय निवडावे लागतील.
मुंबई: स्टेट बॅक ऑफ इंडियातील ग्राहकांना आता चेक पेमेंट रोखायचे असल्यास खास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला आता चेक पेमेंट रोखण्यासाठी बँकेच्या शाखेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. अॅपच्या माध्यमातून रिक्वेस्ट पाठवून तुम्ही चेके पेमेंट रोखू शकता. मात्र, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेकडे नोंदवलेला असला पाहिजे. (SBI offer easy options to stop payment of cheque online know easy process)
इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने चेक पेमेंट कसे रोखाल?
* प्रथम onlinesbi.com या संकेतस्थळावर लॉग इन करा. * ई सर्व्हिसेसमधील स्टॉप चेक पेमेंट पर्याय निवडा. * तुमच्या चेकबुकचे खातेक्रमांक सिलेक्ट करा. * त्यानंतर तुम्हाला स्टार्ट चेक नंबर आणि एंड चेक नंबरची विचारणा केली जाईल. * चेक कोणत्या प्रकाराच आहे तो पर्याय क्लिक करावा. * चेक पेमेंट थांबवण्याचे कारण नमूद करावे. * यासाठी तुमच्याकडून आकारण्यात येणारे शुल्क स्क्रीनवर दिसेल. हे पैसे तुमच्या खात्यामधून वळते केले जातील. * त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे. * ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून सर्व तपशील असलेला एक मेसेज येईल.
SBI योनो अॅपवरुन चेके पेमेंट कसे थांबवाल?
एसबीआयच्या योनो अॅपवरुन तुम्ही चेक पेमेंट रोखण्यासाठी रिक्वेस्ट टाकू शकता. त्यासाठी अॅपमधील रिक्वेस्ट पर्यायावर क्लिक करुन चेक बुक आणि स्टॉप चेक हे पर्याय निवडावे लागतील. त्यानंतर ड्रॉपडाऊन मेन्यूत जाऊन अकाऊंट नंबर निवडावा. त्यानंतर तुम्हाला स्टार्ट चेक नंबर आणि एंड चेक नंबरची विचारणा केली जाईल. नंतर चेक पेमेंट थांबवण्याचे कारण नमूद करावे. त्यानंतर रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी भरल्यानंतर तुमचे चेक पेमेंट थांबवले जाईल.
संबंधित बातम्या:
Home Loan : गृहकर्ज घ्यायचय, मग ‘या’ गोष्टी नक्की तपासून घ्या
Swiss bank मधील भारतीयांच्या वाढत्या पैशांचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळलं, बँकेकडे पुरावे मागितले
SBI ग्राहक सेवा केंद्र सुरु करा आणि बसल्या जागी हजारो रुपये कमवा
(SBI offer easy options to stop payment of cheque online know easy process)