SBI च्या ग्राहकांना गिफ्ट, एकाच अकाउंटमध्ये तीन सेवा; बचत, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे लाभ

एसबीआयने त्यांच्या ग्राहकांसाठी एक दमदार ऑफर आणली आहे. ग्राहकांना एकाच खात्यामध्ये बचत, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे फायदे मिळतील. ग्राहकांना तीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही. त्यांना एकाच खात्याद्वारे तीनही सेवा उपलब्ध होतील.

SBI च्या ग्राहकांना गिफ्ट, एकाच अकाउंटमध्ये तीन सेवा; बचत, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे लाभ
आयसीआयसीआय बँकेची नवी सुविधा
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 2:57 PM

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने (SBI) ग्राहकांसाठी अनोखी भेट आणली आहे. एसबीआयने ग्राहकांसाठी 3-in-1 खात्याची सोय केली आहे. यामध्ये बचत खाते ( Saving Account) डिमॅट खाते (Demat Account) आणि ट्रेडिंग खाते (Trading Account) यांना एकाच धाग्यात गुंतविते. या खात्यातून ग्राहकांना पेपरलेस आणि सहज ट्रेडिंग करता येईल. ग्राहकांना ही सुविधा एकाच खात्याद्वारे मिळेल. एसबीआयने ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे.

एसबीआयने त्यांच्या ट्विटर हँडलवरुन 3-in-1 खात्याचा अनुभव घेता येईल. हे खाते तुम्हाला एकाचवेळी सहजसोपे आणि पेपरलेस ट्रेडिंगचा अनुभव देईल. या खात्यात बचत, डीमॅट आणि ट्रेडिंग यांची सुविधा ग्राहकांना मिळेल. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी https://bank.sbi/web/personal-banking/investments-deposits/stocks-securities/3-in-1-account या लिंकला भेट द्यावी.

अत्यावश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला एसबीआयचे हे 3-in-1 खाते सुरु करायचे असेल तर तुमच्याजवळे काही महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यात 1. पॅनकार्ड अथवा फॉर्म 60 (PAN or Form 60) 2. छायाचित्र 3. ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट्स ( OVD) यामध्ये पासपोर्ट (Passport)  आधारकार्ड (Aadhar) मोटार वाहन परवाना (Driving License) मतदान ओळखपत्र (Voter ID Card) रोजगार हमी योजनेचे कार्ड (MGNREGA Job Card) यांची आवश्यकता आहे.

डीमॅट अथवा ट्रेडिंग खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट साईज छायाचित्र, पॅनकार्ड सत्यप्रत, आधारकार्ड सत्यप्रत एक कॅन्सल चेक अथवा बँक स्टेटमेंट, ई-मार्जिन सेवा. ट्रेडसाठी ई-मार्जिन सेवाची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळं या सुविधेनुसार, कोणीही कमीत-कमी 25 टक्के मार्जिन सह ट्रेड करु शकतो. मार्जिन मिळविण्यासाठी कॅश अथवा कोलटरलचा उपयोग घेऊन 30 दिवसांपर्यंतच्या स्थितीला पुढे नेऊ शकतो.

खाते उपलब्ध होण्यासाठी हे करा

खाते उघडण्यासाठी ग्राहकांना या साध्या स्टेप फॉलो कराव्या लागतील स्टेप 1 ः एसबीआई सिक्योरिटीज वेब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ट्रेंडिंग खात्यात लॉग इन करावे लागेल स्टेप 2 ः ऑर्डर प्लेसमेंट (खरेदी/विक्री) मेनूवर जावे स्टेप 3 ः ऑर्डर देते वेळ प्रॉडक्ट टाईप ला ई-मार्जिन रुपात निवडा याविषयी अधिक माहितीसाठी इच्छुक व्यक्तींनी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे

खात्याची वैशिष्टये

1. लोअर मार्जिन 2. ऑर्डर डिलवरीमध्ये करण्याची सोय/ स्केअर ऑफ 3. कॅरी युवर पोझिशन 4. मार्जिन हे कॅश आणि स्टॉक रुपात असेल

स्टेट बँकेचे वेतन खाते

एसबीआयच्या संकेतस्थळानुसार, बँकेचे वेतन खातेधाकांना (Salary Account) वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादीमध्ये सूट मिळते. याशिवाय इतर काही फायदे आहेत. त्यामध्ये ज्यांना बँकेत सॅलरी अकाऊंट उघडले आहे. या खातेधारकांना बँक मल्टी सिटी चेक, एसएमएस अलर्ट, ऑनलाईन एनईएफटी, आरटीजीएस (NEFT/RTGS) मोफत सेवा, कोणत्याही बँकेच्या एटीएममधून ट्रॅन्झॅक्शनची सेवा अशा सुविधा पुरविते.

बेसिक अकाऊंट

SBI BSBD खातेदारांना एका आर्थिक वर्षात 10 धनादेश मोफत मिळतात. त्यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यानंतरच्या 10 धनादेशाच्या पासबुकसाठी 40 रुपये आणि जीएसटी चार्ज लागतो. 25 चेक असलेल्या चेकबुक साठी 75 रुपये चार्ज आकारला जातो. परंतु, ज्येष्ठ नागरिकांसाठी चेकबुकवर कोणताही आकार घेतला जात नाही. बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट कोणतीही व्यक्ती उघडू शकते. परंतु, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकवूत घटकांसाठी हे खाते आहे. केवायसी (KYC) पूर्तता केल्यानंतर हे बँक खाते उघडता येते.

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

खाणीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आपली मुले खेळायला कुठे जातायत यावर लक्ष ठेवा…!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.