SBI WhatsApp Banking | व्हॉट्सअॅपवर आता चेक करा बॅलन्स आणि स्टेटमेंट, रजिस्ट्रेशनसाठी लागणार अवघा एक मिनिट

SBI WhatsApp Banking | एसबीआयने ग्राहकांसाठी नवीन फिचर आणले आहे. ग्राहकांना त्यांचे बॅलन्स आणि व्यवहाराचा तपशील व्हॉट्सअपवर तपासता येणार आहे .

SBI WhatsApp Banking | व्हॉट्सअॅपवर आता चेक करा बॅलन्स आणि स्टेटमेंट, रजिस्ट्रेशनसाठी लागणार अवघा एक मिनिट
व्हॉट्सअपवर बॅलेन्स करा चेकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 7:53 PM

SBI WhatsApp Banking | देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने (SBI) ग्राहकांसाठी आणखी एक फिचर आणले आहे. त्यामुळे ग्राहकांना काही सेंकदांत त्यांच्या खात्याचा तपशील (Mini Statement) तपसता येईल. तसेच खात्यातील शिल्लकी(Balance in Account) ही पाहता येईल. त्यासाठी ग्राहकांना एसएमएस (SMS) करण्याची गरज नाही. वा मोबाईल अॅपवर जाऊन अथवा इंटरनेट बँकिंग वा एटीएम सेंटरवर ( ATM Centre) जाण्याची गरज नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) सहकार्याने ग्राहकांसाठी ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. अनेक बँकांनी हे नवे फिचर (News Feature) ग्राहकांसाठी आणले आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेनेही पुढाकार घेतला आहे. ग्राहकांना अनेक सुविधा देण्यासाठी बँके अग्रेसर आहे. खासगी बँकांनी सुरु केलेले हे फिचर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने ही सुरु केले आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांचे व्हाट्सअप चाळता चाळता बँकेतील शिल्लकी अथवा खात्याचा तपशील व्हॉट्सअप फिचरच्या सहायाने बघता येतील.

नव्या सेवेचे फायदे

एसबीआयच्या व्हॉट्सअॅप बँकिंग सेवेचा लाभ बचत खातेधारक आणि क्रेडिट कार्डधारक घेऊ शकतात. ही सुविधा सुरू करण्यासाठी खातेदारांना एसबीआयकडे नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर बँकेचे ग्राहक त्यांच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकतील. तसेच बचत खात्याचे मिनी स्टेटमेंट पाहू शकतील. त्याचबरोबर क्रेडिट कार्डधारक या सेवेचा वापर करून खात्याचा तपशील आणि खर्चाचा तपशील बघू शकतील. एवढंच नाही तर रिवॉर्ड पॉइंट्स, थकीत रक्कम यासह इतर माहिती तपासू शकतील.

क्रेडिट कार्ड धारकासाठी प्रक्रिया

एसबीआय क्रेडिट कार्डधारक व्हॉट्सअॅप बँकिंग सेवांसाठी नोंदणी करू शकतो. कार्ड धारकाला त्याच्या व्हॉट्सअॅपवरून 9004022022 नंबरवर OPTIN टाइप करून पाठवावे लागेल. याशिवाय ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 08080945040 मिस्ड कॉल देऊ शकतात. तसेच त्याला मोबाइल अॅपच्या माध्यमातून या फीचरवर साइन अप करता येईल.

अशी करा नोंदणी

  1. बँकेत रजिस्टर्ड मोबाईल क्रमांवरुन फोनमधील मॅसेज ऑप्शन ओपन करा
  2. मेसेजमध्ये WAREG टाइप करा आणि स्पेस देऊन तुमचा खाते क्रमांक टाका
  3. आता हा मेसेज 7208933148 क्रमांकावर एसएमएस करा
  4. सेवा वापरण्यासाठी, आपण या नंबर Hi असं उत्तर देणे आवश्यक आहे
  5. असं करताच तुमच्या व्हॉट्सअॅपवरचा सर्व्हिस मेन्यू ओपन होईल.
  6. त्यानंतर तुम्हाला 90226 902226 हा व्हॉट्सअॅप मेसेज नंबर मिळेल.
  7. याचा अर्थ तुमची नोंदणी झाली आहे
  8. आता मेन्यूमध्ये हवी ती माहिती निवडा
  9. तुम्ही सेवेबद्दल माहिती ही विचारू शकता.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.