SBI Alert ! एसबीआयची ऑनलाईन बँकिंग सेवा काही काळ ठप्प होणार, जाणून घ्या नेमके कधी ते

मेंटेनन्सचे काम 6 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 22:45 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.15 वाजेपर्यंत चालेल. या 150 मिनिटांत तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरू शकत नाही.

SBI Alert ! एसबीआयची ऑनलाईन बँकिंग सेवा काही काळ ठप्प होणार, जाणून घ्या नेमके कधी ते
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 6:44 PM

नवी दिल्ली : जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल आणि तुम्ही बँकेचे ऑनलाईन अॅप्लिकेशन YONO द्वारे व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. एसबीआय ऑनलाईन सिस्टमच्या मेंटेनन्समुळे तुम्ही शुक्रवारी रात्री ऑनलाईन सुविधा वापरू शकणार नाही. बँकेने अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देत केव्हापासून आपण ऑनलाईन बँकिंग करू शकणार नाही, हे स्पष्ट केले आहे. (SBI’s online banking service will be down for a while, know exactly when)

वास्तविक, एसबीआय, तुम्हाला ऑनलाईन सेवांद्वारे बहुतेक सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. वेळोवेळी आपली ऑनलाईन सिस्टम देखील अपडेट करते आणि या देखभालीचे काम बँक करते. परंतु, मेंटेनन्स दरम्यान ग्राहक एसबीआयच्या ऑनलाईन बँकिंगचा वापर करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा आपण काही काळासाठी मेंटेनन्स कालावधीपर्यंत ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाही.

किती वेळ चालेल मेंटेनन्सचे काम?

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मेंटेनन्सचे काम 6 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 22:45 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.15 वाजेपर्यंत चालेल. या 150 मिनिटांत तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरू शकत नाही.

आपण काय करू शकत नाही?

बँकेने सांगितले की, मेंटेनन्स दरम्यान तुम्ही इंटरनेट बँकिंग, योनो(YONO), योनो लाइट(YONO Lite), योनो बिझनेस(Yono Business)द्वारे कोणताही व्यवहार करू शकणार नाही.

YONO LITE आणि SBI YONO मध्ये काय फरक?

योनो लाईट हे इतर बँकांच्या सामान्य बँकिंग अॅप्लिकेशनप्रमाणे एक सामान्य अॅप्लिकेशन आहे. याद्वारे ऑनलाईन बँकिंग संबंधी काम करता येते. तथापि, या अॅप्लिकेशनद्वारे आपण आपल्या माहितीमध्ये काहीही संपादित करू शकत नाही. YONO SBI अॅप्लिकेशनला दोन्ही अॅप्लिकेशनची मोठी आवृत्ती म्हटले जाऊ शकते. तथापि, यामध्ये, या अॅप्लिकेशनद्वारे खरेदी वगैरे करता येते. या व्यतिरिक्त, आपण या अॅप्लिकेशनद्वारे खात्याची वैयक्तिक माहिती देखील एडिट करू शकता – जसे की आपण एसएमएस अलर्ट चालू किंवा बंद करू शकता किंवा इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड बदलू शकता.

देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे एसबीआय

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. या बँकेच्या एकूण 22,000 पेक्षा जास्त शाखा, 57,889 एटीएम देशभरात उपलब्ध आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या 85 कोटी आणि मोबाईल बँकिंग वापरकर्त्यांची संख्या 19 कोटी आहे. डिसेंबर 2020 च्या शेवटी SBI च्या एकूण UPI वापरकर्त्यांची संख्या 135 कोटी होती. (SBI’s online banking service will be down for a while, know exactly when)

इतर बातम्या

रवी दहियाचं गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर

Onion Price : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अलर्ट, ‘या’ कारणामुळे लासलगावमधील दर 100 ने कमी, पुढे काय होणार?

'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.