जॉब शोधताय? जाणून घ्या कोणत्या सेक्टरमध्ये आणि कुठल्या शहरांमध्ये नोकरीच्या सर्वाधिक संधी

बर्‍याच राज्यात लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे औद्योगिक उपक्रमही वाढले आहेत आणि नोकरीच्या संधीही वाढल्या आहेत.

जॉब शोधताय? जाणून घ्या कोणत्या सेक्टरमध्ये आणि कुठल्या शहरांमध्ये नोकरीच्या सर्वाधिक संधी
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 9:02 PM

मुंबई : कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) देशाच्या विविध भागात लॉकडाउन लागू झाल्यानंतर निर्बंध सातत्याने कमी केले जात आहेत. बर्‍याच राज्यात लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे औद्योगिक उपक्रमही वाढले आहेत आणि नोकरीच्या संधीही वाढल्या आहेत. जॉब पोर्टल सायकी मार्केट नेटवर्कच्या (SCIKEY Market Network) अहवालानुसार, जूनमध्ये बहुतांश क्षेत्रातील नोकरभरतीत सकारात्मक वाढ झाली आहे. (Searching Jobs, see here how much possibilities in Banking, IT, Retail pharma and other sector which one is suitable for you)

अहवालानुसार आतापर्यंत आयटी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या बाबतीत वेगाने वाढ होत होती, परंतु जूनमध्ये इतरही अनेक क्षेत्रांतील नोकरभरतीच्या कामांत सुधारणा झाली आहे. विक्री, मानव संसाधन, विपणन इत्यादी क्षेत्रातही वाढ नोंदविली गेली आहे. हा अहवाल सायकी मार्केट नेटवर्कच्या जॉब पोर्टलवर पोस्ट केलेल्या भरती डेटावर आधारित आहे.

कोणत्या क्षेत्रात किती संधी?

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये बँकिंग क्षेत्रातीत भरतीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयटी आणि बीपीओ क्षेत्रातील भरतीच्या बाबतीत प्रत्येकी 18-18 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर फार्मा क्षेत्रात 16.9 टक्के, आरोग्य क्षेत्रात 20 टक्के, विमा क्षेत्रात 12 टक्के, किरकोळ क्षेत्रात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिक्षण क्षेत्रात 12.1 टक्के आणि एफएमसीजी क्षेत्रात ते 16 टक्के वाढ झाली आहे. तथापि, दूरसंचार क्षेत्रात 8 टक्क्यांनी घट झाली आहे.

कोणत्या शहरांमध्ये सर्वाधिक संधी?

शहरांच्या बाबतीत जर आपण नोकरीच्या संधींचा विचार केला तर मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये टीयर -1 शहरांमध्ये भरतीतील कामांमध्ये दुप्पट वाढ झाली. मुंबईत 12 टक्के, पुणे 6 टक्के, दिल्लीत 1 टक्के, चेन्नईत 12 टक्के, हैदराबादमध्ये 12 टक्के आणि कोलकातामध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. तथापि, बंगळुरुमधील भरती उपक्रमांत दोन टक्क्यांनी घट झाली आहे. यापूर्वी या शहरांमध्ये लॉकडाउन बर्‍याच वेळा लावण्यात आला होता. जयपूर आणि अहमदाबादसारख्या टीयर -2 शहरांमध्ये अनुक्रमे 30 आणि 22 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीचे सह-संस्थापक करुणजितकुमार धीर म्हणाले की, “साधीच्या रोगामुळे देशभरात आलेल्या मंदीमुळे बहुतांश नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या. परंतु आता त्यात सुधारणा होत आहेत. लॉकडाउन लागू केल्यापासून बर्‍याच क्षेत्रांसाठी हा एक वाईट टप्पा होता. नोकरीच्या शोधात असलेल्या काहींना दिलासा मिळाल्यामुळे मागील महिन्यात भरती कामांना वेग आला आहे. आम्हाला आशा आहे की, येत्या काही महिन्यांत नोकरीच्या संधींबाबत प्रत्येक क्षेत्रात अधिक सुधारणा होईल.

इतर बातम्या

क्रेडिट कार्ड ऑनलाईन अप्लाय करण्याचे बरेच फायदे; जाणून घ्या बँकांची ही सोपी प्रक्रिया

क्रेडिट आणि डेबिट कार्डशिवाय प्रीपेड कार्डही आहे, तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या याबद्दल सर्व काही

एलपीजी सिलिंडरचा नवीन ब्रँड बाजारात, पाहताच कळेल किती शिल्लक आहे गॅस, इतका हलका की कोणीही उचलू शकेल!

(Searching Jobs, see here how much possibilities in Banking, IT, Retail pharma and other sector which one is suitable for you)

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.