म्युच्युअल फंड कंपन्यांचा क्रिप्टोशी काडीचाही संबंध नको! SEBI चे फर्मान, गुंतवणूक करता येणार नाही

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने (SEBI) म्युच्युअल फंड कंपन्यांना क्रिप्टो करन्सीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सेबी बोर्डाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास म्युच्युअल फंड कंपन्यांना मज्जाव करण्यात आला आहे. याविषयीची परवानगी देण्यास सेबीने नकार दिला आहे.

म्युच्युअल फंड कंपन्यांचा क्रिप्टोशी काडीचाही संबंध नको! SEBI चे फर्मान, गुंतवणूक करता येणार नाही
SEBI
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 11:12 AM

मुंबई : म्युच्युअल फंड (Mutual funds) कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात धुमाकूळ घालत असलेल्या क्रिप्टोपासून (Cryptocurrency) चार हात दूर राहण्याचा सल्ला सेबीने दिला आहे. क्रिप्टो या ऑनलाईन चलनात अनेक भारतीयांनी गुंतवणूक केली आहे. मात्र चलनाच्या विश्वासहर्तेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यात आता सेबीने म्युच्युअल फंडांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास मनाई केली आहे. सेबीच्या (SEBI) बोर्डाची बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (NII) मध्ये 2 ते 10 लाखांसाठी 33 टक्के कोटा आरक्षित करण्यात आआला आहे. तर 10 लाखांपेक्षा जास्त असलेल्या अर्जांसाठी 67 टक्के कोटा राखीव असेल. 1 एप्रिल 2022 रोजीपासून हा नवा नियम लागू असेल. (SEBI asks mutual funds not to invest into crypto Until the Regularity Clarity)

कम्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CAMS) आणि Cfintech या दोघांनी म्युच्युअल फंड हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु केले आहे. ही कंपनी म्युच्युअल फंडाविषयीच्या सेवा पुरवते. बँक खाते बदल, मोबाईल क्रमांक बदल, ई-मेल आयडीतील बदल याविषयीच्या सेवा MF Central पुरविते. याविषयीचे अॅपही तयार करण्यात आले असून लवकरच ते प्ले-स्टोअरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

धोरण नाही तोपर्यंत गुंतवणूक नाही

सेबीचे संचालक अजय त्यागी यांनी सांगितले की, म्युच्युअल फंड कंपन्यांना क्रिप्टो करन्नसीमध्ये गुंतवणुकीची परवानगी नाकारण्यात आली आहे. क्रिप्टो संबंधित कंपनी वा परदेशी कंपनीत फंड्स ऑफ फंड्स नुसार म्युच्युअल फंडला गुंतवणुकीची मान्यता देण्यात आलेली नाही. जोपर्यंत क्रिप्टोसंदर्भात धोरण ठरविण्यात येत नाही. तोपर्यंत म्युच्युअल फंडांनी क्रिप्टोपासून चार हात दूर रहावे असे त्यांनी स्पष्ट केले.

सेबी बोर्डेाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय

  • भांडवल आणि डिसक्लोजरच्या गरजेविषयक नियमांमध्ये सेबी बोर्डाने बदल करण्यास मंजुरी दिली.
  • सेबीने वैकल्पिक गुंतवणूक फंड, परदेशी पोर्टफोलिओमध्ये गुंतवणुकीला नियंत्रित करण्यासंबंधीच्या नियमात सुधारणा करण्यास मंजुरी दिली.
  • आयपीओ तून मिळालेल्या धनराशीचा वापर भविष्यातील अधिग्रहण करण्यासाठीची मर्यादा घालून देण्यात आली. याशिवाय कंपनीच्या सर्वसाधारण कामकाजासाठी आरक्षित फंडावर ही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

इतर बातम्या

फार्मा कंपनीचे स्टॉक पळणार सुसाट, करा गुंतवणूक व्हा मालामाल! 

कोरोनाने लग्नाचा बेत फसला तरी मिळणार पैसे, 7500 रुपयात 10 लाखांचा लग्न  विमा; अनेक कंपन्या इन्शुरन्ससाठी मैदानात  

(SEBI asks mutual funds not to invest into crypto Until the Regularity Clarity)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.