AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेबीकडून म्युच्युअल फंडाच्या परदेशातील गुंतवणुकीवर निर्बंध; जाणून घ्या गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंडांना परदेशी बाजारात गुंतवणूक करण्यास मज्जाव केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सेबीने असा निर्णय का घेतला? त्या मागील कारणे काय आहेत याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

सेबीकडून म्युच्युअल फंडाच्या परदेशातील गुंतवणुकीवर निर्बंध; जाणून घ्या गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 5:40 AM

नागपुरात (Nagpur) राहून आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) गुंतवणूक (Investment) करता येत असल्यानं जयंत खूश आहेत. परदेशातील बाजारपेठेत गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करून बक्कळ कमाई करत आहेत. परंतु सेबीच्या संदर्भात आलेल्या बातमीमुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. अलीकडेच बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंडांना परदेशी बाजारात गुंतवणूक करण्यास अंकुश घातलाय. अनेक म्युच्युअल फंडाकडून परदेशी बाजारपेठेत गुंतवणूक करण्यात येते. गुंतवणूकदारांकडून जमा करण्यात आलेला निधी परदेशातील शेअर्समध्ये गुंतवण्यात येतो. सेबीनं सर्व म्युच्युअल फंडाना परदेशात गुंतवणूक करू नका असे निर्देश दिलेत. तसेच नवीन गुंतवणूकदारांकडून ठेवी घेण्यासही मज्जाव केलाय. जयंतसारख्या अनेक गुंतवणूकदारांना सेबीच्या निर्णयाचं कारण समजू शकलं नाहीये. आरबीआय आणि सेबीनं म्युच्युअल फंडाद्वारे परदेशात गुंतवणुकीची मर्यादा ही 7 अब्ज डॉलरपर्यंत ठेवली आहे. ज्यावेळी म्युच्युअल फंडाची गुंतवणूक या मर्यादेपर्यंत पोहचते तेंव्हा परदेशातील गुंतवणुकीवर, म्युच्युअल फंडावर निर्बंध घालण्यात येतात. सेबीनं परदेशी गुंतवणुकीचे आकडेवारी जाहीर केली नाही. मात्र, निर्धारित फंडानी परदेशातील गुंतवणुकीची मर्यादा पूर्ण केली आहे. त्यामुळेच सेबीनं बंदी घातल्याचे बोलले जात आहे.

परदेशी गुंतवणुकीच्या संदर्भातील नवे नियम

गेल्या वर्षी जून महिन्यात सेबीने म्युच्युअल फंड उद्योगाद्वारे परदेशी गुंतवणुकीच्या नियमांमध्ये बदल केले होते. ते बदल काय होते ते पाहुयात कोणताही म्युच्युअल फंड परदेशातील बाजारात जास्तीत जास्त 1 अब्ज गुंतवणूक करू शकतो, तर संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योग कमाल 7 अब्ज गुंतवणूक करू शकतो. ही मर्यादा कोणत्याही एका आर्थिक वर्षासाठी नाही. म्हणजेच कोणत्याही वेळी म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण परकीय गुंतवणूक 7 अब्जांपेक्षा जास्त असू शकत नाही. कोणताही म्युच्युअल फंड ओव्हरसीज एक्सचेंज ट्रेडेड फंड (OETF) मध्ये कमाल 300 कोटी डॉलर गुंतवणूक करू शकतो. संपूर्ण उद्योगासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा 1 अब्ज डॉलर एवढी आहे.

नवीन गुंतवणूकदारांबाबत अनिश्चितता

सेबीच्या आदेशामुळे जयंतच्या सध्याच्या गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. त्याला त्याची गुंतवणूक काढून घेण्याची आवश्यकता नाही आणि त्याची एसआयपी देखील चालू राहील. परंतु, अशा योजनांमध्ये एकरकमी गुंतवणुकीला परवानगी दिली जाणार नाही. सेबीने गुंतवणूकदारांना अशा योजनांमध्ये एसटीपी आणि एसआयपी करण्यास मनाई केलेली नाही. मात्र नवीन गुंतवणूकदारांनी एसआयपी सुरू करण्याबाबत अनिश्चितता आहे. पुढील काळात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीची मर्यादा वाढू शकते, त्यानंतर नवीन गुंतवणूकदार गुंतवणूक सुरू करू शकतील, असे असोसिएशन ऑफ रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स (एआरआयए) चे अध्यक्ष, लोवाई नवलखी यांनी सांगितले.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.