अवघ्या साडेचार रुपयांच्या समभागाची किंमत झाली 998 रुपये; गुंतवणूकदार झाले मालामाल

Share Market | या कालावधीत, त्याने आपल्या भागधारकांना सुमारे 12,000 टक्के परतावा दिला. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षभरात गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअरची किंमत 4.45 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 998.45 रुपये प्रति शेअर इतकी वाढली आहे.

अवघ्या साडेचार रुपयांच्या समभागाची किंमत झाली 998 रुपये; गुंतवणूकदार झाले मालामाल
शेअर मार्केट
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 11:41 AM

मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. आगामी काही महिन्यांमध्ये मुंबई बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असे भाकीत वर्तविले जात आहे. अशावेळी आतापासूनच गुंतवणूक करुन चांगला फायदा पदरात पाडून घेण्याची संधी आहे.

गेल्या काही दिवसांत अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या penny stock ने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. अशा समभागांची किंमत साधारण 25 रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना हे समभाग खरेदी करणे शक्य असते. सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये असे अनेक पेनी स्टॉक आहेत. भविष्यात हे पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन देऊ शकतात. यापैकीच एक समभाग म्हणजे गोपाला पॉलीप्लास्ट (gopala polyplast).

गेल्या एका महिन्यात हा पेनी स्टॉक 535.10 रुपयांवरून 998.45 रुपयांवर झेपावला आहे. या कालावधीत समभागाची किंमत तब्बल 86 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 6 महिन्यांत, हा पेनी स्टॉक 14.75 रुपयांवरून 998.45 रुपये प्रति स्टॉक पातळीपर्यंत वाढला आहे. 2021 मध्ये, हा पेनी स्टॉक 8.26 रुपयांच्या पातळीवरून वर चढून 998.45 रुपये प्रति स्टॉक पातळीवर पोहोचला. या कालावधीत, त्याने आपल्या भागधारकांना सुमारे 12,000 टक्के परतावा दिला. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षभरात गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअरची किंमत 4.45 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 998.45 रुपये प्रति शेअर इतकी वाढली आहे.

गुंतवणूकदार झाले मालामाल

गोपाला पॉलीप्लास्ट शेअरच्या किमतीचा इतिहास पाहता, जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.86 लाख रुपये झाले असते. 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्या एक लाखाचे 67.67 लाख झाले असतील.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 च्या सुरुवातीला 8.26 रुपयांच्या पातळीवर या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य आज 1.21 कोटी रुपये झाले असेल. एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये वर्षभरापूर्वी कंपनीचे शेअर्स 4.45 रुपये प्रति शेअर दराने खरेदी करून 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता या गुंतवणूकीचे एकूण मूल्य 2.24 कोटी रुपये झाले असेल.

संबंधित बातम्या:

50 हजार गुंतवून सुरु करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडून मिळणार आर्थिक मदत; महिन्याला लाखो रुपये कमावण्याची संधी

राकेश झुनझुनवालांनी ‘या’ दोन कंपन्यांच्या समभागावर वर्षभरात मिळवले 216 टक्के रिटर्न्स

अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.