एका वर्षात 2874 टक्के रिटर्न्स; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल
Share Market | तुम्ही अगदी वर्षभरापूर्वीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 393 टक्क्यांचा परतावा मिळाला असता. 27 जुलै 2020 रोजी Alkyl Amines Chemicals च्या समभागाची किंमत 909.5 इतकी होती.
मुंबई: शेअर बाजारात सध्या Alkyl Amines Chemicals या कंपनीचा चांगलाच बोलबाला आहे. कारण या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. Alkyl Amines Chemicals च्या समभागाने गुंतवणुकादारांना गेल्या तीन वर्षात 1400 टक्के तर पाच वर्षात 2874 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
तुम्ही अगदी वर्षभरापूर्वीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 393 टक्क्यांचा परतावा मिळाला असता. 27 जुलै 2020 रोजी Alkyl Amines Chemicals च्या समभागाची किंमत 909.5 इतकी होती. सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा ही किंमत 4490 रुपयांवर पोहोचली. याचा अर्थ वर्षभरात या समभागाने गुंतवणुकदारांना 393 टक्क्यांचा घसघशीत परतावा दिला आहे.
वर्षभरापूर्वी तुम्ही एल्किल अमिन्सच्या समभागात पाच लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याची किंमत 24.68 लाख रुपये इतकी असेल. कोरोनाकाळात रसायनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची चांदी झाली होती. त्याचाच फायदा Alkyl Amines Chemicals ला मिळाला आहे. या वेगवान घोडदौडीमुळे Alkyl Amines Chemicals ची मार्केट कॅप 22 हजार कोटी रुपये झाले आहे. मार्च तिमाहीत या कंपनीने 92.60 कोटी रुपयांचा नफा कमावला. एका वर्षभरापूर्वी याच अवधीत Alkyl Amines Chemicals कंपनीने 49.21 कोटींचा नफा कमावला होता. सध्या गुजरात आणि महाराष्ट्रात या कंपनीच्या जवळपास 12 कारखान्यांमध्ये रसायनांची निर्मिती केली जाते.
गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
एका सत्रात गुडलक इंडियाच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, 10 टक्क्यांवर अप्पर सर्किट लागले. गेल्या पाच सत्रांमध्ये या समभागाची किंमत तब्बल 31 टक्क्यांनी वाढली आहे.
संबंधित बातम्या:
Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स