अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा

Share Market | गेल्या दहा वर्षांचा विचार करायचा झाल्यास एस्ट्रल शेअर्स कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना तब्बल 8,560 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. दहा वर्षांपूर्वी एस्ट्रल शेअर्सच्या एका समभागाची किंमत अवघी 24 रुपये इतकी होती. हीच किंमत आता 2063 रुपये इतकी झाली आहे.

अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा
शेअर मार्केट
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 12:12 PM

मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे एस्ट्रल शेअर्स (Astral Shares). या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे.

गेल्या दहा वर्षांचा विचार करायचा झाल्यास एस्ट्रल शेअर्स कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना तब्बल 8,560 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. दहा वर्षांपूर्वी एस्ट्रल शेअर्सच्या एका समभागाची किंमत अवघी 24 रुपये इतकी होती. हीच किंमत आता 2063 रुपये इतकी झाली आहे. गेल्या महिनाभरातच या समभागाने गुंतवणूकदारांच्या गंगाजळीत 4 टक्क्यांची भर टाकली आहे. एका महिन्यात समभागाची किंमत 1982.05 वरुन 2063 रुपये इतकी झाली आहे.

एस्ट्रल शेअर्सचा आलेख

गेल्या सहा महिन्यात एस्ट्रल शेअर्सच्या समभागांची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे. सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या एका समभागाची किंमत 1591.65 रुपयांवरून 2085.30 रुपयांपर्यंत पोहोचली होती. गेल्या वर्षभरात एस्ट्रलचे शेअर्स 850.95 च्या किंमतीवरून 140% वाढून 2063 रुपये झाले आहेत. 5 वर्षांपूर्वी अॅस्ट्रल शेअर्सची किंमत 263.73 रुपये होती. त्याचप्रमाणे, गेल्या 10 वर्षांत हा स्टॉक 23.82 रुपयांच्या किंमतीपेक्षा 86.4 पट वाढून 2063 रुपये झाला आहे.

गुंतवणूकदार मालामाल

एखाद्या व्यक्तीने दहा वर्षांपूर्वी एस्ट्रल कंपनीचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य जवळपास 86.04 लाख इतके झाले आहे. अगदी महिनाभरापूर्वीही गुंतवणूक करणाऱ्यांना आतापर्यंत चांगला परतावा मिळाला आहे. कंपनीची आर्थिक स्थिती आणि तांत्रिक विश्लेषणानुसार आगामी काळात एस्ट्रलच्या समभागांची किंमत आणखी वर जाऊ शकते. हा समभाग 2250 ते 2300 रुपयांची पातळी गाठले, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे अजूनही या समभागात गुंतवणूक करण्याची संधी आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक

फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

ओलाच्या ई-स्कूटरसाठी कर्ज सहज उपलब्ध होणार, ईएमआय 2999 पासून सुरू, कंपनीने देशातील सर्व बँकांशी केला करार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.