21.49 रुपयांच्या समभागाची किंमत झाली 343 रुपये, तीन महिन्यांत गुंतवणूकदार मालामाल
Share Market | कॉन्टिनेंटल केमिकल्सच्या समभागाची आतापर्यंतची वाटचाल पाहता, या स्टॉकमध्ये तीन महिन्यांपूर्वी गुंतवलेली 1 लाख रुपयांच्या रक्कमेचे मूल्य आज जवळपास 15.98 लाख रुपये इतके झाले आहे. गेल्या 21 दिवसात या समभागाचा भाव 177.94% वाढला आहे.
मुंबई: सध्या शेअर बाजारात गीता कॉन्टिनेन्टल केमिकल्स (continetal chemicals) या समभागाची प्रचंड चर्चा आहे. अवघ्या तीन महिन्यांत continetal chemicals कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 1,497.25 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या समभागाने फक्त तीन महिन्यांत आपल्या भागधारकांना सुमारे 1,500 टक्के परतावा दिला आहे. 24 जून 2021 रोजी हा हिस्सा 21.49 रुपयांवरून 343.5 रुपये झाला आहे. याचा अर्थ कॉन्टिनेन्टल केमिकल्सच्या शेअरने गेल्या तीन महिन्यांत 1,497.25% परतावा दिला आहे. (Share Market High gain stock)
गुंतवणूकदार अक्षरश: मालामाल
कॉन्टिनेंटल केमिकल्सच्या समभागाची आतापर्यंतची वाटचाल पाहता, या स्टॉकमध्ये तीन महिन्यांपूर्वी गुंतवलेली 1 लाख रुपयांच्या रक्कमेचे मूल्य आज जवळपास 15.98 लाख रुपये इतके झाले आहे. गेल्या 21 दिवसात या समभागाचा भाव 177.94% वाढला आहे.
कंपनीचा नेमका व्यवसाय?
नोएडास्थित कॉन्टिनेंटल केमिकल्स कंपनीच्या तिमाहीच्या निव्वळ नफ्यात 2000% टक्के वाढ झाली आहे. जून 2020 तिमाहीत निव्वळ नफा 0.01 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्टँडअलोन आधारावर विक्री 140% वाढून 0.12 कोटी रुपये झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात हेच प्रमाण 0.05 कोटी रुपये होते. कॉन्टिनेंटल केमिकल्स हात साबण, डिटर्जंट आणि सौंदर्य प्रसाधने इत्यादी उत्पादनांची निर्मिती करते. तयार करतात. नोएडात या कंपनीचा प्लांट आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.
गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
संबंधित बातम्या:
Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स
(Share Market High gain stock)