अवघ्या 54 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 879 रुपये; सहा महिन्यांत गुंतवणूकदार मालामाल
Share Market | गेल्या पाच वर्षांचा विचार करायचा झाल्यास क्वालिटी फार्मा कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना तब्बल 40 पट रिटर्न्स मिळवून दिले आहेत. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 28 सप्टेंबर 2016 रोजी क्वालिटी फार्मा एका समभागाची किंमत अवघी 21.75 रुपये इतकी होती.
मुंबई: सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. गुंतवणूकदारांना असाच फायदा मिळवून देणारा एक जुना समभाग म्हणजे क्वालिटी फार्मा (Kwality Pharma). या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा मिळवून दिला आहे.
गेल्या पाच वर्षांचा विचार करायचा झाल्यास क्वालिटी फार्मा कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना तब्बल 40 पट रिटर्न्स मिळवून दिले आहेत. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 28 सप्टेंबर 2016 रोजी क्वालिटी फार्मा एका समभागाची किंमत अवघी 21.75 रुपये इतकी होती. हीच किंमत आता 878.90 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी या कंपनीत करण्यात आलेल्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 40 लाख इतके झाले आहे. गेल्या महिनाभरातच या समभागाने गुंतवणूकदारांच्या गंगाजळीत 110 टक्क्यांची भर टाकली आहे. एका महिन्यात समभागाची किंमत 419.90 वरुन 878.90 रुपये इतकी झाली आहे.
सहा महिन्यांत गुंतवणूकदार मालामाल
गेल्या सहा महिन्यांत क्वालिटी फार्माच्या समभागाची किंमत 54 रुपयांपासून 878.90 रुपयापर्यंत वाढली आहे. सहा महिन्यांपूर्वी तुम्ही या कंपनीचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य जवळपास 2.10 लाख इतके झाले आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.
गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
संबंधित बातम्या:
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक
फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही