अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार पाच वर्षात झाले लखपती
Share Market | राघव प्रोडक्टिविटी इनहँसर ही कंपनी भांडवली बाजारात एप्रिल 2016 मध्ये सूचिबद्ध झाली होती. त्यावेळी कंपनीच्या एका समभागाची किंमत 28.60 रुपये इतकी होती. आज याच समभागाची किंमत 804.80 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
मुंबई: सध्या शेअर बाजारात राघव प्रोडक्टिविटी इनहँसर (Raghav Productivity Enhancers) या कंपनीच्या समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये Raghav Productivity Enhancersकंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 2700 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या समभागाने अवघी 10 हजार गुंतवणूक केलेल्या लोकांना पाच वर्षात अक्षरश: मालामाल केले आहे.
राघव प्रोडक्टिविटी इनहँसर ही कंपनी भांडवली बाजारात एप्रिल 2016 मध्ये सूचिबद्ध झाली होती. त्यावेळी कंपनीच्या एका समभागाची किंमत 28.60 रुपये इतकी होती. आज याच समभागाची किंमत 804.80 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर कंपनीचे भांडवली बाजारात एकूण मूल्य 875 कोटी रुपये इतके झाले आहे.
शेअर मार्केटमधील बड्या व्यक्तीची गुंतवणूक
भारतीय शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनीही राघव प्रोडक्टिविटी इनहँसर या कंपनीत 30.9 कोटींची गुंतवणूक केली आहे. झुनझुनवाला यांनी ऑगस्ट 2016 मध्ये या कंपनीचे समभाग विकत घेतले होते. गेल्या पाच वर्षांमध्ये टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, सेल, जिंदल स्टील या कंपन्यांच्या तुलनेत राघव प्रोडक्टिविटी इनहँसरच्या समभागाने चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती
राघव प्रोडक्टिविटी इनहँसर कंपनीने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 23 लाख रुपये इतका नफा कमावला. नफ्यातील ही वाढ 638 टक्के इतकी आहे. या तिमाहीत कंपनीच्या विक्रीचा आकडा 20.61 कोटी रुपये इतका राहिला. 2017-18 या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 5.87 कोटी तर 208-19 या वर्षात कंपनीच्या नफ्याचा आकडा 8.05 कोटी रुपये इतका होता. जयपूरस्थित ही कंपनी खनिज उत्खनन आणि स्टोन सप्लायर म्हणून काम करते. याशिवाय, कंपनीकडून फेरो एलॉय, रॅमिंग मास, सिलिका रॅमिंग मिक्स आणि पिग आयर्न याची निर्मिती आणि निर्यात केली जाते.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.
गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
संबंधित बातम्या:
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक
फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही