‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका वर्षात एक लाखाचे एक कोटी

Share Market | प्रोसिड इंडियाच्या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना तब्बल 11000 टक्के रिटर्न्स दिले आहेत. वर्षभरापूर्वी एखाद्या व्यक्तीने प्रोसिड इंडियाचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य 1.12 कोटी रुपये इतके झाले आहे.

‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; एका वर्षात एक लाखाचे एक कोटी
शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 7:09 AM

मुंबई: सध्या शेअर बाजारात हिंदुजा प्रोसिड इंडिया (Proseed India) या समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात Proseed India कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 11000 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. गेल्यावर्षी 20 ऑगस्ट 2020 रोजी प्रोसिड इंडिया समभागाचा भाव अवघा 32 पैसे इतका होता. मात्र, एका वर्षात या समभागाची किंमत 35.90 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

याचा अर्थ प्रोसिड इंडियाच्या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना तब्बल 11000 टक्के रिटर्न्स दिले आहेत. वर्षभरापूर्वी एखाद्या व्यक्तीने प्रोसिड इंडियाचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्याचे मूल्य 1.12 कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या महिनाभरात प्रोसिड इंडियाच्या समभागाची किंमत झपाट्याने वाढली आहे. या कंपनीचे भांडवली मूल्य 370.11 कोटी रुपये इतके आहे.

कंपनीत गुंतवणूक करणे योग्य आहे का?

या कंपनीचा समभाग झपाट्याने वर जात असला तरी प्रोसिड इंडियाच्या आर्थिक स्थितीबाबत अनेक शंका आहेत. या समभागाची किंमत झपाट्याने वाढत असली तरी कंपनी सातत्याने तोट्यात आहे. गेल्यावर्षी एप्रिल-जून तिमाहीत प्रोसिड इंडियाला 9 लाख रुपयांचा तोटा झाला होता. मात्र, यंदा याच कालावधीत तोट्याची रक्कम 30 लाखांवर जाऊन पोहोचली आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.