Share Market Update: भांडवली बाजारात ‘या’ पाच गोष्टींवर लक्ष ठेवा, पैसे कमावण्याची संधी

Share Market | गेल्या काही दिवसांत शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी सार्वकालिक उच्चांक पार केले आहेत. मात्र, बुधवारी शेअर बाजारात किंचित घसरण पाहायला मिळाली. इन्फोसिस, रिलायन्स आणि टीसीएस या बड्या कंपन्यांच्या समभागांची घसरण झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीतही घसरण पाहायला मिळाली. मात्र, अशा परिस्थितीतमध्येही काही समभाग गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतात.

Share Market Update: भांडवली बाजारात 'या' पाच गोष्टींवर लक्ष ठेवा, पैसे कमावण्याची संधी
शेअर मार्केट
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 6:53 AM

मुंबई: पैसे कमावण्याचा झटपट मार्ग म्हणून भांडवली बाजाराकडे (Share Market) पाहिले जाते. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे जोखमीचे काम असले तरी योग्य धोरण आखून दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुलनेत जोखीमही कमी असते. त्यामुळे ब्लु चीप किंवा मिड कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरतो. (Stock market trading tips)

गेल्या काही दिवसांत शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी सार्वकालिक उच्चांक पार केले आहेत. मात्र, बुधवारी शेअर बाजारात किंचित घसरण पाहायला मिळाली. इन्फोसिस, रिलायन्स आणि टीसीएस या बड्या कंपन्यांच्या समभागांची घसरण झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीतही घसरण पाहायला मिळाली. मात्र, अशा परिस्थितीतमध्येही काही समभाग गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देऊ शकतात.

मारुती सुझुकीच्या उत्पादनात घट

शेअर बाजारात बुधवारी मारुती सुझुकी कंपनीचा समभाग 1.39 टक्क्यांनी खाली घसरला. सेमीकंडक्टरमुळे ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या उत्पादनात 8 टक्क्यांनी घट झाली. या वृत्ताचा नकारात्मक परिणाम होऊन मारुतीच्या समभागाची किंमत घसरली. तसेच Auto PLI ही स्कीम केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी नसेल, अशी माहितीही पुढे येत आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात मारुती सुझुकीसह अन्य ऑटो कंपन्यांच्या समभागात मोठे चढउतार पाहायला मिळू शकतात.

टेक्स्टाईल कंपन्यांच्या समभागांमध्ये मुव्हमेंट

केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि निर्यातीला चालना देण्यासाठी 10,683 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे टेक्स्टाईल क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग गुरुवारी तेजीत असू शकतात.

युको बँक

युको बँक RBIच्या PCA (प्रॉम्प्ट करेक्टिव एक्शन) निकषाची पूर्तता करण्यात यशस्वी ठरली आहे. युको बँकेकडून भांडवली नियमांचे पालन करू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गुरुवारी युको बँकेच्या समभागात तेजी पाहायला मिळू शकते.

SBI LIFE

कॅनडा पेन्शन फंडने SBI LIFE चे 1159 कोटी समभाग विकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बुधवारी SBI LIFE चा समभाग 1.68 टक्क्यांनी खाली घसरला. आजदेखील या समभागात घसरण पाहायला मिळू शकते.

एअरटेल आणि व्होडाफोन

दूरसंचार कंपन्यांसाठीच्या पॅकेजमुळे एअरटेल आणि व्होडाफोन- आयडिया या दोन कंपन्यांच्या समभागाचा भाव बुधवारी वधारताना दिसला. आजदेखील या समभागात घसरण पाहायला मिळू शकते.

संबंधित बातम्या:

20 वर्षांचे कर्ज 10 वर्षांत कसे फेडायचे? जाणून घ्या ‘स्मार्ट सेव्हिंग्स’मधून पैशांची बचत करण्याची सोपी माहिती

Share Market: ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; वर्षभरात 400 टक्के रिटर्न्स

एका वर्षात या बँकिंग इक्विटी म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, सरासरी 50 टक्क्यांहून अधिक उत्पन्न

(Stock market trading tips)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.